Join us

सावरकर जीवनावली प्रदर्शनाची यशस्वी सांगता; हजारो सावरकर प्रेमींनी लावली हजेरी

By मनोहर कुंभेजकर | Published: May 30, 2023 4:03 PM

प्रदर्शनाचे सुंदर आणि नियोजनबध्द आयोजनबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी पोयसर  जिमखाना आणि स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समितीच्या सर्व  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जाहिर आभार व्यक्त केले.

मुंबई-बोरिवलीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित दोन दिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनावली प्रदर्शन आयोजित केले होते. काल रात्री या प्रदर्शनाची यशस्वी सांगता झाली.गेल्या दोन दिवसात हजारो सावरकर प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समिती व पोयसर जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने बोरिवली येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान रंगरंगोटी आणि नव्या स्वरूपात  विद्युत रोषणाईने सजवले होते. यंदा प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी सावरकरांची जीवनावली दृष्य  स्वरूपात आणि चित्रफिती  द्वारे आणि त्याच बरोबर सावरकर रचित आणि देशभक्तीपर गाण्यांनी या कार्यक्रमाची उंची गाठली. येथील चित्र प्रदर्शनात  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कुटुंब,त्यांचे जन्मस्थान आणि वास्तव्य याचबरोबर अंदमान तुरुंगाची प्रतिकृती,तुरुंगातील यातना याचे दालन लक्षवेधी होते.याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य काहीं दुर्मिळ वस्तू देखील प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या अशी माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.

या प्रदर्शनाचे उद्घाटन गेल्या रविवारी सायंकाळी राज्यपाल  रमेश बैस यांच्या हस्ते आणि उत्तर प्रदेशचे पूर्व राज्यपाल राम नाईक, खासदार गोपाळ शेट्टी,स्थानिक आमदार सुनील राणे,आमदार योगेश सागर,आमदार अतुल भायखळकर,आमदार मनीषा चौधरी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले होते.तर राम नाईक हे दोन दिवस पूर्णवेळ येथे उपस्थित होते. खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीतील सामाजिक,शैक्षणिक, संगीत,वैद्यकीय,क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिंचा गौरव आणि सन्मान करण्याची परंपरा या विषयी राज्यपालांनी गौरवोद्गार काढताना ही परंपरा सर्व संस्थांनी जपली पाहिजे असे निक्षून सांगितले.

प्रदर्शनाचे सुंदर आणि नियोजनबध्द आयोजनबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी पोयसर  जिमखाना आणि स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समितीच्या सर्व  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जाहिर आभार व्यक्त केले. 7 एकरच्या जागेत 18 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर स्वावरकर उद्यान उभारताना येथील 14 आदिवासी बांधवांना सन्मानाने येथील जवळच्या जागेत स्थलांतरीत करून उत्तर मुंबईकरांना अभिमान वाटावा असे राजकीय  जीवनात गेली 40 ते 42 वर्ष  माझ्या बरोबर असलेल्या कार्यकर्त्याच्या सहकार्याने आकर्षक उद्यान उभे केले हा किस्सा सांगून त्यांनी गेल्या १८ वर्षाचा या उद्यानाचा इतिहास प्रकट केला.वीर सावरकरांच्या जीवनातून देशभक्ति प्रेरणा सर्वांना मिळत असते असे त्यांनी सांगितले.