भिवंडी : ख-या जीवनात बालगंधर्वाच्या पत्नीच्या अंगावर दागिने नव्हते. परंतु, नाटकात काम करताना बालगंधर्व खरे दागिने घालून काम करीत होते. तर नटरंगातील नाच्या हा तमाशातील विदूषक असतो. परंतु, त्यालासुद्धा जीवनाचे विविध चटके सोसावे लागतात. हे दोन्ही टोकावरील विषयांचे चित्रपट यशस्वी झाले; एवढेच नव्हे त्याचे अनुकरण इतर भाषेच्या सिनेमांनी केले. मराठी सिनेमांना तर या यशस्वी चित्रपटांनी ऊर्जा दिली, अशी माहिती रवी जाधव यांनी भिवंडीत झालेल्या मुलाखतीत दिली. ‘शर्यत’ चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी ‘नटरंग’चे दिग्दर्शक रवी जाधव यांची मुलाखत घेतली.अशोक बागवे यांनी पद्मश्री अण्णासाहेब जाधव स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. विविध कवींच्या कवीता, गीते व सादरीकरणावर प्रकाश टाकताना त्यांनी इंग्लंडमध्ये शेक्सपीअरचे साहित्य जपून त्याकरिता शेक्सपीअर सिटी निर्माण केली.महाराष्ट्रातील बऱ्याच मान्यवर कवींनी त्यांच्या कविता त्यांच्या आवाजात सादर केल्या आहेत. त्याचा अनुभव आज नवी पिढी घेऊ शकत नाही. त्याकरिता राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने या सर्व कवींचे आवाज व सादरीकरणाचा संग्रह करून ते जपून ठेवले पाहिजे, अशी सूचना केली. (प्रतिनिधी)
यशस्वी चित्रपटाने मराठी सिनेमांना ऊर्जा दिली
By admin | Published: December 03, 2014 11:57 PM