Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 04:29 AM2021-04-13T04:29:57+5:302021-04-13T07:15:32+5:30

Sharad Pawar : शरद पवार यांना ३० मार्चला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली.

Successful operation on Sharad Pawar at Breach Candy Hospital | Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Next

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर सोमवारी ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. बलसरा यांनी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केली असून त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
शरद पवार यांना ३० मार्चला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर 
छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ७ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यानंतर १५ दिवसांनंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यामुळे शरद पवार यांना रविवारी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते.
 

Web Title: Successful operation on Sharad Pawar at Breach Candy Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.