Join us  

६७ वर्षांच्या महिलेवर कृत्रिम सांधा बसविण्याची यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 3:14 AM

स्टेमलेस पद्धतीचा फायदा म्हणजे, यात रुग्णांना वेदना होत नाही. खांद्यातील स्नायूंना शस्त्रक्रियेदरम्यान इजा पोहोचत नाही. देशात पहिल्यांदा खांद्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्टेमलेस पद्धतीचा फायदा म्हणजे, यात रुग्णांना वेदना होत नाही. खांद्यातील स्नायूंना शस्त्रक्रियेदरम्यान इजा पोहोचत नाही. देशात पहिल्यांदा खांद्यात कृत्रिम सांधा बसविण्याची शस्त्रक्रिया स्टेमलेस पद्धतीने करण्यात आलीय. परळ येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी स्टेमलेस पद्धतीने एका महिलेच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या मते, या शस्त्रक्रियेत रुग्णाला सामान्य पद्धतीने केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेत होणाऱ्या वेदनांपेक्षा, कमी वेदना होतात आणि शस्त्रक्रिया करताना खांद्यातील स्नायूंना इजा पोहोचत नाही.डॉ. चिंतन देसाई आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी स्टेमलेस पद्धत वापरून ६७ वर्षांच्या वर्षा शहा यांच्या खांदेदुखीवर उपचार केले. वर्षा शहा यांना खांदेदुखीमुळे काहीच उचलता येत नव्हते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना त्यांचा हातही उचलता येत नव्हता. स्वत:ची तयारीदेखील करता येत नव्हती, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.जून महिन्यात वर्षा रुग्णालयात खांदेदुखीचा त्रास असल्याने उपचारांसाठी दाखल झाल्या. पहिल्यांदा खांदेदुखी सामान्य वाटत होती, पण डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, खांदेदुखीचा त्रास गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता. वर्षा यांच्या खांदेदुखीविषयी बोलताना डॉ. चिंतन देसाई म्हणतात की, वर्षा मला भेटायला आल्या, तेव्हा त्यांनी खांदेदुखीची तक्रार केली. त्यांनी आधी काही डॉक्टरांना दाखवले होते, पण आम्ही तपासणी केल्यानंतर स्पष्ट झाले की, वर्षा यांना खांद्याचा संधिवात आहे. खांद्याचा संधिवात असल्याने, आम्ही त्यांना कृत्रिम सांधा बसविण्यास सांगितले. सामान्यत: या शस्त्रक्रियेत खांद्यात एक पोकळी तयार करून, त्यामध्ये रॉड टाकला जातो. डॉ. देसाई सांगतात, या वेळी एका वेगळ्या पद्धतीचा वापर करण्याचे ठरविले. देशात कृत्रिम सांधा बसविण्यासाठी बहुदा स्टेमलेस पद्धत पहिल्यांदाच वापरण्यात आलीय. या शस्त्रक्रियेचा फायदा म्हणजे, यात रुग्णाला त्रास होत नाही आणि खांद्याच्या स्नायूंनाही इजा पोहोचत नाही. या शस्त्रक्रियेत खांद्याचा काही भाग काढून, त्याठिकाणी कृत्रिम सांधा बसविला जातो.