मुंबई : मानवी शरीरावर उपचार करण्यासाठी एमआरआय काढला जातो. परंतु चेंबूरच्या कटियाल रुग्णालयामध्ये एका जखमी सापावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी त्याचा एमआरआय काढला आहे. दहिसर भागात हा साप एका झाडावरून पडला. त्या वेळी स्थानिकांनी त्याला काठीने मारण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला चेंबूरच्या कटियाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा सर्प विषारी असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.कटियाल रुग्णालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा कटियाल याबाबत म्हणाल्या, ज्या वेळी सापाला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या वेळी त्याची प्रकृती गंभीर होती. रुग्णालयात जखमी सापाला त्वरित वेदनाशामक औषधे देण्यास सुरुवात करण्यात आली. उपचारादरम्यान पाठीचा एक्स-रे काढण्यात आला. मात्र, पुरेशी माहिती न मिळू शकल्याने निदान झाले नाही. त्यानंतर इतर डॉक्टरांसोबत चर्चा करून सापाच्या पाठीचा एमआरआय काढून योग्य निदान केले. सद्य:स्थितीला सापाची प्रकृती स्थिर असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
सापाच्या पाठीचा एमआरआय काढून केले यशस्वी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 2:46 AM