कुलाबा-वांद्रे–सीप्झ मेट्रो ३ चे २ किलोमीटर भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 06:13 PM2018-05-07T18:13:59+5:302018-05-07T18:13:59+5:30

पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (मुं.म.रे.कॉ) कवळ ६ महिन्यात २१९२ मीटरचे भुयारीकरण पूर्ण केलेले आहे.

Successfully completed 2 Colaba-Bandra-Seepz Metro 3's 2 Kilometers Hybridization | कुलाबा-वांद्रे–सीप्झ मेट्रो ३ चे २ किलोमीटर भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण

कुलाबा-वांद्रे–सीप्झ मेट्रो ३ चे २ किलोमीटर भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण

googlenewsNext

मुंबई- मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (मुं.म.रे.कॉ) कवळ ६ महिन्यात २१९२ मीटरचे भुयारीकरण पूर्ण केलेले आहे.

तब्बल ३३.५ किमी लांबी असलेल्या या पूर्ण प्रकल्पाच्या भुयारीकरणाकरिता मुं.मे.रे.कॉला १७ टनेल बोअरिंग मशिन्सची (टीबीएम्स) आवश्यकता आहे. त्यापैकी ११ मशिन्स शहरात दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत ८ मशीन्सद्वारे भुयारीकरणाचे काम करण्यात येत आहे. या मशीन्सला महाराष्ट्रातील सूर्या, वैतरणा, तानसा, कृष्णा, गोदावरी, तापी आणि वैनगंगा या नद्यांची नाव देण्यात आले आहेत. मेट्रो-३च्या विविध पॅकेजमध्ये होत असलेल्या भुयारीकरणाचा तपशील पुढीलप्रमाणे :-

आझाद मैदान :- या पॅकेज-२ मधील वैतरणा १ व २ टीबीएम्सद्वारे ग्रँट रोड पर्यंत ४.५ किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी ४५० मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

नयानगर :- या पॅकेज-४ अंतर्गत कृष्णा १ व २ या टीबीएम्सद्वारे दादर मेट्रो स्थानकापर्यंत २.५ किमी भुयारीकरण करण्यात येणार असून त्यापैकी १००५ मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

विद्यानगरी :- या पॅकेज ५ अंतर्गत गोदावरी १ व २ या मशिन्सद्वारे आंतरदेशीय विमानतळ स्थानकापर्यंत २.९८ किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. सध्या या पॅकेज अंतर्गत ३४२ मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

मरोळ नाका :- या पॅकेज ७ अंतर्गत २ टीबीएमद्वारे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचे १.२ किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये सध्या वैनगंगा १ व २ या मशीनद्वारे ३९५ मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
कामाच्या प्रगतीबाबत समाधान करून मुं.मे.रे.कॉच्या व्यवस्थापकीय संचालक, अश्विनी भिडे म्हणाल्या की, "आज आम्ही ८ टीबीएमद्वारे २००० मीटर पेक्षा अधिक भुयारीकरण पूर्ण केले आहे. प्रकल्पाच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. १५ टीबीएम्सची कारखाना स्वीकृती परिक्षण पूर्ण झालेले असून प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या १७ ही टीबीएम्स जुलै अखेर दाखल होऊन सर्व पॅकेजमध्ये भुयारीकरणास प्रारंभ होणेअपेक्षित आहे. यामुळे कामाला अधिक गती प्राप्त होईल.मुंबईकरांनी दिलेल्या सहकार्यामुळेच आम्ही हा टप्पा गाठू शकलो.

Web Title: Successfully completed 2 Colaba-Bandra-Seepz Metro 3's 2 Kilometers Hybridization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.