Sanjay Raut : असे आंडू-पांडू खूप आले, संभाजी भिडेंवर संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 02:53 PM2021-04-09T14:53:47+5:302021-04-09T14:54:28+5:30

राज्यात होत असलेल्या लसीकरणावरुन केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांवर राऊत यांनी टीका केली. भारतीय जनता पक्षाचे एक विचारक आहेत, त्यांनी कोरोनाने मरणाऱ्या लोकांबद्दल अपशब्द वापरले आहेत.

Such Andu-Pandu came to the roots of Maharashtra a lot, Raut got angry at Sambhaji Bhide | Sanjay Raut : असे आंडू-पांडू खूप आले, संभाजी भिडेंवर संजय राऊत संतापले

Sanjay Raut : असे आंडू-पांडू खूप आले, संभाजी भिडेंवर संजय राऊत संतापले

Next
ठळक मुद्देदेशात सर्वत्र सुरु असलेल्या खेळखंडोबाला केंद्र व राज्य सरकार दोन्हीही जबाबदार आहेत. कोरोना हा रोगच अस्तित्वात नाही. ज्याचे त्याचे आयुष्य प्रत्येकाच्या स्वाधिन आहे.

मुंबई - कोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्याच लायकीची नाहीत. कोरोना हा मूळात रोगच नाही. त्यामुळे त्यावरुन सुरु असलेला लॉकडाऊनचा बावळटपणा सरकारने बंद करावा, असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. त्यानंतर, अनेकांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. आता, खासदार संजय राऊत यांनीही भिडेंवर टीका केलीय. 

राज्यात होत असलेल्या लसीकरणावरुन केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांवर राऊत यांनी टीका केली. भारतीय जनता पक्षाचे एक विचारक आहेत, त्यांनी कोरोनाने मरणाऱ्या लोकांबद्दल अपशब्द वापरले आहेत. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आम्ही कोण आहोत, महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले. महाराष्ट्राने अशा आंडू-पांडूंना धडा शिकवलाय, अशा शब्दात राऊत यांनी संभीज भिडेंवर टीका केली. आतासुद्धा शिवसेना म्हणून, महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. तर, पळता भूई थोडी होईल, असे राऊत यांनी म्हटले. 

देशात सर्वत्र सुरु असलेल्या खेळखंडोबाला केंद्र व राज्य सरकार दोन्हीही जबाबदार आहेत. कोरोना हा रोगच अस्तित्वात नाही. ज्याचे त्याचे आयुष्य प्रत्येकाच्या स्वाधिन आहे. लोक स्वत:च्या आरोग्याबाबत पाहून घेतील. सरकारने या गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही. हातावरची पोटं असलेली किती लोकं या लॉकडाऊनमध्ये मेली. किती लोक बेरोजगार झाले. त्याची फिकीर कोणाला नाही. रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांना लाठीने मारले जाते आणि दारुच्या दुकानात गर्दी करणाऱ्यांना सोडले जाते. सर्व व्यापार बंद ठेवून दारुची दुकाने सुरु ठेवता, हा काय प्रकार आहे.

देशात सर्वत्र बावळट, नेभळट प्रजा असल्यामुळे कोरोनाचा आक्रोश सुरु आहे. लॉकडाऊनचीच गरज नाही. लोकांचे आरोग्य लोकांवर सोडून द्यावं, आणि सरकारने त्यांचा कारभार योग्य पद्धतीने करावा. दारु, मावा, मटका, चरस, गांजा सर्व मोकाट आणि एकत्र येऊन मुलांनी खेळायचे नाही, व्यायाम करायचा नाही हा महामुर्खपणा आहे. मास्क लावण्याने काहीही होत नाही. त्यामुळे मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. लष्करी जवानांना मास्क घालून लढायला सांगायचे का. जिथे मरण्यासाठी लढायचे आहे, तिथे मास्कची गरज नाही, असे भिडे म्हणाले

नोटेवरचे गांधी आदर्श ठेवून कोरोना वाढेल

शिवछत्रपती व संभाजी महाराजांना आदर्श ठेवून सरकारने कारभार करावा. नोटेवरचे गांधी आदर्श ठेवून हा कोरोना आणखी वाढेल, असेही संभाजी भिडे यावेळी म्हणाले.
 

Web Title: Such Andu-Pandu came to the roots of Maharashtra a lot, Raut got angry at Sambhaji Bhide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.