पहिली विद्युत बस ‘शिवाई’ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. गुरुवारी मुंबई सेंट्रल येथील आगारात मान्यवरांच्या हस्ते तिचे लोकार्पण करण्यात आले.अशी आहे ‘शिवाई’
च्बसची लांबी १२ मीटर, रुंदी २.६ तर उंची ३.६ मीटर इतकी आहे.च्विद्युत वाहन चालविण्यासाठी ३२२ किलो वॅट क्षमतेची लिथिअम आयर्न फॉस्फेटची बॅटरी वापरण्यात आली आहे.च्आसन क्षमता ४३+१ असून, त्यांना पुशबॅकची आरामदायी आसने आहेत.च्बसमध्ये ३६ किलो वॅट क्षमतेची वातानुकूलित यंत्रणा आहे.च्एकदा चार्ज केल्यानंतर कमीतकमी ३०० कि.मी.चा पल्ला बस गाठेल. बसच्या चार्जिंगसाठी किमान १ ते ५ तास (१ तास जलद चार्जिंग व ३ ते ५ तासांचे सर्वसाधारण चार्जिंग) इतका वेळ लागणार आहे.च्बस १ किलो वॅटमध्ये किमान १ ते १.२५ कि.मी. चालण्याची अपेक्षा आहे.च्वाहन चालविण्याचा खर्च हा महामंडळातील ‘शिवशाही’च्या तिकीट खर्चापेक्षा जास्त आणि ‘शिवनेरी’च्या तिकीट खर्चापेक्षा कमी आहे.च्विद्युत बसच्या वापरामुळे प्रदूषणा कमी होईल.च्खरेदीसाठी भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयामार्फत जाहीर केलेल्या फेम-२ योजनेअंतर्गत प्रतिबस रु. ५५ लाखांपर्यंत अनुदान मिळेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सध्या ५० वाहनांसाठी अनुदान देण्याचे भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने जाहीर केले असून, उर्वरित १०० वाहनांसाठीही अनुदान मिळविण्याचे महामंडळाचे प्रयत्न आहेत.च्वाहनांच्या चार्जिंगसाठी दिवसा रु. ६/- प्रति युनिट व रात्री ४.५/- प्रति युनिट या सवलतीच्या दरात विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे.