अकरावी प्रवेशाचा सावळा गोंधळ

By admin | Published: July 29, 2016 02:32 AM2016-07-29T02:32:10+5:302016-07-29T02:32:10+5:30

विशेष आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अजूनही साशंकता व्यक्त केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत, अर्धवट अर्ज भरले आहेत,

The sudden confusion of eleven entrances | अकरावी प्रवेशाचा सावळा गोंधळ

अकरावी प्रवेशाचा सावळा गोंधळ

Next

- प्राची सोनवणे, नवी मुंबई

विशेष आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अजूनही साशंकता व्यक्त केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत, अर्धवट अर्ज भरले आहेत, तसेच जागेचे वाटप न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाचव्या आॅनलाइन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची पायपीट सुरू असून प्रवेश प्रक्रि येबाबत नाराज आहेत.
विशेष आॅनलाइन फेरीच्या वेळापत्रकानुसार ३० जुलै रोजी मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप केले जाणार आहे. १ व २ आॅगस्ट रोजी प्रवेश अर्ज सादर करणे गरजेचे आहे. ४ आॅगस्ट रोजी नव्याने गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. ५ व ६ आॅगस्ट रोजी गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना दूरचे कॉलेज मिळाले आहे, अथवा विषय चुकीचा निवडला आहे, शाखा बदल करायची आहे, प्राधान्यक्र म चुकला आहे त्यांना या विशेष फेरीकरिता नव्याने नोंदणी तसेच फी भरणे आवश्यक आहे. जुलै २०१६ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही यात सहभागी होता येणार आहे.

महाविद्यालयांच्या तुकड्या कमी होणार?
आॅनलाइन प्रक्रि येनुसार, एखाद्या शैक्षणिक संस्थेत ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होणार तितकेच विद्यार्थी त्या तुकडीत राहणार आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या महाविद्यालयात फक्त १५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला तर तेवढ्याच विद्यार्थ्यांची संचमान्यता मिळणार आहे.

पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांच्या दांड्या
पाल्याच्या अकरावी प्रवेशासाठी नोकरी, धंदा सोडून पालकांना पळापळ करावी लागत आहे. वाशीत राहणाऱ्या अशोक पाटील यांनी मुलीच्या प्रवेशासाठी रजा घेतली असून शैक्षणिक धोरण चुकीचे असल्याची टीका त्यांनी केली आहे. किती दिवस रजा घेऊन प्रवेशासाठी फेऱ्या माराव्या लागणार, असा असंतोष पालकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: The sudden confusion of eleven entrances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.