अवकाळी पावसाने कोट्यवधींचे नुकसान

By admin | Published: March 2, 2015 10:38 PM2015-03-02T22:38:34+5:302015-03-02T22:38:34+5:30

अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील १६ हजार ८२४ हेक्टर आंबा क्षेत्रापैकी ६ हजार ७१२ हेक्टरातील आंब्यास बसला आहे.

Sudden loss of millions of crores | अवकाळी पावसाने कोट्यवधींचे नुकसान

अवकाळी पावसाने कोट्यवधींचे नुकसान

Next


जयंत धुळप ल्ल अलिबाग
अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील १६ हजार ८२४ हेक्टर आंबा क्षेत्रापैकी ६ हजार ७१२ हेक्टरातील आंब्यास बसला आहे. तर ३ हजार ७७६ हेक्टर काजू क्षेत्रापैकी २ हजार ४५६ हेक्टरातील काजूला बसला आहे. वाल, पांढरे कांदे, तोंडली अशा ७०७ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाला क्षेत्रासही या पावसाचा फटका बसल्याची माहिती रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे यांनी दिली आहे.
तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार अशा त्रिसदस्यीय समितीच्या माध्यमातून नुकसानीबाबत पंचनामे करण्याचे काम तत्काळ सुरु करण्यात आले आहे. आठ दिवसांत हे काम पूर्ण होईल, आणि नेमके किती नुकसान झाले याचा अहवाल प्राप्त होईल व त्यानुसार शेतकरी व बागायतदारांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा अहवाल शासनास पाठविण्यात येईल, असे तरकसे यांनी सांगितले.
पावसामुळे जिल्ह्यात गाई-म्हशींच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी जनावरांच्या वर्षभराच्या वैरणीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाताच्या पेढ्यांची देखील नुकसानी पंचनाम्यांत विचारात घेण्यात येईल, असे तरकसे सांगितले.
पावसामुळे आंबा व काजूवर भुरी रोगाची तसेच तुडतुड्याची बाधा होण्याची शक्यता आहे. आबा निर्यातीसाठी युरोपीन व अन्य देशांच्या अटीशर्थींची कल्पना बागायतदारांना देण्याकरिता निर्यातदार व बागायतदार यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. त्याच्या समन्वयाकरिता ‘मँगोनेट’ ही व्यवस्था करण्यात आली असून ८१२ बागायतदार मँगोनेट सदस्य झाले आहेत.

म्हसळा : म्हसळ्यात शनिवार व रविवारी पडलेल्या पावसाची तालुक्यात ६३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आंबा, काजू, वाल, चवळी, हरभरा, कलिंगड लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे व वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तहसीलदार वीरसिंग वसावे व कृषी अधिकारी चौधरी यांनी नुकसानीची संयुक्त पाहणी केली. तालुक्यात आंब्याचे अंदाजे ६३५ हेक्टर क्षेत्र, काजू २३५ हेक्टर क्षेत्र, भाजीपाला ४४ हेक्टर क्षेत्र, कडधान्य १६५ हेक्टर क्षेत्राचे व तालुक्यातील किमान ३० ते ४० वीटभट्ट्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची अंदाजे रक्कम एक ते दीड कोटी वर्तवली जात असून शासनाकडून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, याकरिता शेतकरी व वीट भट्टी मालकांकडून म्हसळा तहसीलदार वसावे यांना निवेदन देण्यात आले.

शासनाकडून योग्य मदत शेतकऱ्यांना करण्यात येणार असून पंचनामा करतेवेळी नुकसानग्रस्त बागायतदारांनी आपले बँक खाते नंबर व संपर्क क्र मांक देण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले. लागवड केलेल्या पिकाच्या उत्पादनाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आता चिंतेत आहे. उत्पादन हाताशी आलेले असताना कीडप्रादुर्भाव होण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे. म्हसळा पंचायत समितीचे सभापती महादेव पाटील, उप-सभापती नाझीम हसवार आदींनी यावेळी निवेदन दिले.

४नागोठणे : शनिवारपासून या भागात पडणाऱ्या अवकाळी पावसाने बागायतदार, शेतकरी तसेच वीट उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. उत्पादन केलेल्या लाखो कच्च्या विटा खराब झाल्या आहेत. त्यामुळे आपल्यालाही नुकसानभरपाई मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून शासनाच्या सहकार्याची मागणी करण्यात येत आहे.

४नागोठणे ते निडी - पळस दरम्यान सिराज पानसरे, मनोज शिवराम शिंदे, वसीम बोडेरे, इर्शाद मुजावर, संतोष भालेकर, चंद्रकांत भालेकर, नरेश बामणे, बाळा मढवी आदींसह अनेक वीट उत्पादक कार्यरत आहेत. दिवाळीनंतर डिसेंबर ते मे महिन्यादरम्यान वीट उत्पादनाची प्रक्रि या चालू असते. या वर्षीही उत्पादन चालू होते, त्यानुसार लाखो विटा तयार झाल्या असतानाच शनिवार सायंकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने लाखो विटांची अक्षरश: माती झाली आहे.

४पावसाने लाखो रु पयांचे नुकसान झाले असून बँकांमधून काढलेले कर्ज आम्ही फेडणार तरी कसे, असे ते सांगत आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून अजून कोणतीही भूमिका स्पष्ट झाली नसल्यामुळे सध्या शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत हा वीट उत्पादकवर्ग डोळे लावून बसला आहे. दरम्यान, या भागात आंबा, काजू, चिकू तसेच वाल, पावटा, मूग, मटकी, चवळी आदी उत्पादने शेवटच्या टप्प्यात आली असतानाच ती या पावसाने नष्ट झाली आहेत.

बागायतदारांना भरपाई द्या
४महाड : महाड, पोलादपूर व माणगाव तसेच आंबा, काजू बागायतदारांचे शेतकऱ्यांचे तसेच वीटभट्टी व्यावसायिकांचे झालेल्या नुकसानीची शासनाने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत असेही गोगावले यांनी निवेदनात म्हटले आहे.
४आंबा बागयतदार हे एकरी पद्धतीवर नसून गुंठा पद्धतीवर आधारित असल्याने नुकसानग्रस्त केवळ मोजक्याच बागायतदारांना त्याचा लाभ होतो. आंबा बागायतदारांना झाडामागे नुकसान भरपाई देण्याची मागणी गोगावले यांनी केली आहे.

 

Web Title: Sudden loss of millions of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.