सुधा करमरकर यांच्या निधनाने बालरंगभूमीचा एक अध्याय संपला –विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 01:57 PM2018-02-05T13:57:05+5:302018-02-05T13:57:13+5:30
अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या कार्यक्षेत्रातआपला ठसा उमटविणाऱ्या आणि मराठी बालरंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांच्या निधनाने बालरंगभूमीचा एक अध्याय संपला, या शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई- अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या कार्यक्षेत्रातआपला ठसा उमटविणाऱ्या आणि मराठी बालरंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांच्या निधनाने बालरंगभूमीचा एक अध्याय संपला, या शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
ज्यांच्याशिवाय बालरंगभूमीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही त्या सुधा करमरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य बालरंगभूमीसाठी खर्ची घातले. केवळ बालनाट्याला वाहिलेली स्वतंत्र नाट्यसंस्था ‘लिट्ल थिएटर- बालरंगभूमी’ची स्थापना केली. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून वेगवेगळी बालनाट्येत्यांनी सादर केली. ‘मधुमंजिरी’, ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘जादूचा वेल’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘चिनी बदाम’, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही श्रीमती करमरकर यांनी सादर केलेली बालनाटकंप्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहतील. बालरंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवलेल्या सुधाताईं यांच्या निधनाने रंगभूमी कायमची पोरकी झाली आहे, असेही तावडे यांनी म्हटले आहे.