Join us

सुधीर काटकर यांच्या ‘थंका कलाकृती’ ठरताहेत लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 1:50 AM

चित्रकार सुधीर काटकर यांचे तिबेटीयन थंका माध्यमातील अनोखे प्रदर्शन कुलाबा येथील जहांगीर कला दालनात आयोजित केले आहे.

मुंबई : चित्रकार सुधीर काटकर यांचे तिबेटीयन थंका माध्यमातील अनोखे प्रदर्शन कुलाबा येथील जहांगीर कला दालनात आयोजित केले आहे. या प्रदर्शनातील आगळ््या वेगळ््या थंका कलाकृती कलारसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना ‘शांतता’ असून याची प्रेरणा गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि विचारसरणी आहे.चित्रकार सुधीर काटकर यांचे हे आठवे एकल प्रदर्शन असून यात तैल रंगांचा वापर करुन थंका कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. या कलाकृतींच्या माध्यमातून हिमालय, लडाखमधील तिबेटीयन समुदायाच्या संस्कृतीचे चित्रही प्रतिबिंबित होताना दिसून येते. सिल्क व सुती कापडांवर नैसर्गिक रंगांनी काढलेल्या या चित्रांना ‘थंका’ असे म्हणतात. या कलाकृतींविषयी चित्रकार सुधीर काटकर यांनी सांगितले की, प्रत्येक थंका कलाकृतीची वेगळी गोष्ट आहे. हिमालय प्रवासादरम्यान अनेक चित्रे रेखाटली. या प्रवासाच्या वेळीच थंका कलेशी ओळख झाली. थंका कलाकृतींमध्ये मुख्यत: बुध्द विचारसरणी, बोधीसत्त्व यांचे विचार दिसून येतात. त्यामुळे या कलेमुळे खूप प्रभावित झालो, याचे मुख्य कारण अध्यात्म आणि कलेचा उत्तम संगम यात आहे. ही संकल्पना कलारसिकांसमोर घेऊन येण्याचा विचार केला. या कलाकृतींमध्ये तिबेटीयन ध्वजांच्या मुख्य रंगांचा अधिक वापर केला आहे. त्यात लाल, हिरवा, निळा आणि पिवळा या रंगांचा समावेश आहे. या कलाकृतींमधून केवळ डोळ््यांचे पारणे फिटत नाही तर मानसिक स्थैर्यही लाभते.>प्रत्येक कलाकृती रेखाटताना त्याची लघुकलाकृती तयार करण्याची सवय आहे, ही कायम जोपासली जाते. त्यामुळे या विषयासंबंधी अनेक लघुकलाकृती माझ्याकडे होत्या. त्यामुळे तिबेटीयन थंका कलाकृती करताना या लघुकलाकृतींना एकत्र शिवण्याचे मोठे आव्हान होते.मात्र याकरिता थंका कलाकृती करणाऱ्या स्थानिक कलाकारांची मदत घेतली. त्यात धर्मगुरु दलाई लामा यांच्या आईची वस्त्रे तयार करणारे दिग्गज कलाकार दोजी यांनीही यासाठी योगदान दिले. हिमालयातील मूंडगोड या तिबेटीयन समुदायाच्या गावात तीन महिने राहिलो. त्यांच्यासोबत राहून या कलाकृती पूर्ण केल्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन बौद्ध भिक्खुंच्या हस्ते झाले, याचा आनंद आहे.