“तुम्ही हजार वर्ष सत्ता राखा, पण राज्यातील महिला...”; मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 08:34 AM2021-09-24T08:34:42+5:302021-09-24T08:35:36+5:30

भाजप नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला.

sudhir mungantiwar criticizes thackeray govt over dombivli case | “तुम्ही हजार वर्ष सत्ता राखा, पण राज्यातील महिला...”; मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर टीका

“तुम्ही हजार वर्ष सत्ता राखा, पण राज्यातील महिला...”; मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर टीका

Next

मुंबई: पुणे, मुंबईतील बलात्काराच्या अमानुष घटनांनी समाजमन सुन्न झाले असतानाच डोंबिवलीतील १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी नऊ महिन्याच्या काळात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी २३ आरोपींना अटक केली. यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, भाजप नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला असून, दोन दिवस अधिवेशन बोलवून चिंतन करावे, असे म्हटले आहे. (sudhir mungantiwar criticizes thackeray govt over dombivli case)

“आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर हल्लाबोल

पीडित मुलगी डोंबिवली ग्रामीण भागात राहते. जानेवारीत तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवीत बलात्कार केला. त्या शरीरसंबंधांचा व्हिडीओ त्याने काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकर व त्याच्या मित्रांनी २९ जानेवारी ते २२ सप्टेंबर या काळात पीडितेवर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड येथे सामूहिक बलात्कार केला. काही आरोपी राजकीय पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. 

“अनंत गीतेंचे म्हणणे १०० टक्के खरे, शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही”

दोन दिवस अधिवशेन बालावून चिंतन करावे

या प्रकरणावर सरकारने दोन दिवस अधिवशेन बोलावून चिंतन करावे. साकीनाकानंतर आता डोंबवली प्रकरण राज्यातील अत्याच्याराच्या घटना आता सांगायला सुरुवात केली तर २४ तास कमी पडतील. सरकारला आमची हात जोडून विनंती आहे. तुम्ही हजार वर्ष सत्तेत राहा, तुमची सत्ता सुरक्षित ठेवा. पण राज्यातील महिलांवर बलात्कार होत आहेत आणि राज्यात आपण या गंभीर विषयावर चर्चा करणार नाही. इतर राज्यातील घटनांचे उदाहरण देऊन आपण राज्यातील घटनांकडे दुर्लक्ष करता, हे बरोबर नाही, या शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. 

“काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला”; रामदास आठवले यांचा खुलासा

दरम्यान, डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा घटनेवर भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त असून, राज्यात भयाचे वातावरण तयार झाले आहे. डोंबिवली भाग जो एक शांत भाग समजला जातो तेथे ही घटना झाली आहे. राज्य सरकारने विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: sudhir mungantiwar criticizes thackeray govt over dombivli case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.