ड्रग्जमध्ये मंत्र्याचा नातेवाईक काम करत असेल, तर त्याची काय पूजा करायची?; मुनगंटीवारांचा सवाल

By मोरेश्वर येरम | Published: January 14, 2021 06:38 PM2021-01-14T18:38:33+5:302021-01-14T18:40:05+5:30

नवाब मलिक हे मंत्री आहेत म्हणून त्यांच्या जावयाने काहीही करावं का? कायद्यानुसार जर कारवाई होत असेल तर मग त्यात राजकारण कशाला आणता?

sudhir mungantiwar slams nawab malik over ncb drugs case issue | ड्रग्जमध्ये मंत्र्याचा नातेवाईक काम करत असेल, तर त्याची काय पूजा करायची?; मुनगंटीवारांचा सवाल

ड्रग्जमध्ये मंत्र्याचा नातेवाईक काम करत असेल, तर त्याची काय पूजा करायची?; मुनगंटीवारांचा सवाल

googlenewsNext

मुंबई
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना त्यांच्या जावयावरील एनसीबीच्या कारवाईवरुन चांगलंच घेरलं आहे. "ड्रग्जमध्ये जर एखाद्या मंत्राचा नातेवाईक काम करत असेल, तर त्याची पूजा करायची का?", असा रोखठोक सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. 

"नवाब मलिक हे मंत्री आहेत म्हणून त्यांच्या जावयाने काहीही करावं का? कायद्यानुसार जर कारवाई होत असेल तर मग त्यात राजकारण कशाला आणता? आरोप जर गंभीर आहेत मग त्यात राजकारण कसलं? तपास करुन योग्य ती कारवाई झालीच पाहिजे", असं मुनगंटीवार म्हणाले. 

"राजकीय नेत्यांनी आता प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे असं सांगून राजकीय नेत्यांबद्दल सामान्य जनतेमध्ये अतिशय वाईट प्रतिक्रिया निर्माण होते. तपासात राजकारण नव्हे, तर जे सुशिक्षित आणि उत्तम शिक्षण घेऊन तपास यंत्रणेत काम करत आहेत. तर त्यांच्यावर विश्वास न दाखवता आणि मुद्दाम कुणी राजकारण केलंच तर न्यायालयं आहेत. तिथंही न्याय मिळतोच", असंही मुनगंटीवार म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय?
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे २० हजार रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ड्रग्जच्या खरेदी-विक्री प्रकरणाच्या संशयातून चौकशीसाठी एनसीबीने समीर खान यांना बोलावलं होतं. 

एनसीबीने याआधीच करण सजनानी यांच्याकडून ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी केम्प्स कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानवाला यालाही अटक केली आहे. 
 

Web Title: sudhir mungantiwar slams nawab malik over ncb drugs case issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.