मुंबई : ऑक्टोबर हिटमुळे शहरातील नागरिक उकाड्याने त्रस्त असताना डासांमुळे होणाऱ्या आजाराने मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार साथीच्या आजारांची आकडेवारी वाढत असून यामध्ये प्रामुख्याने मलेरिया आणि डेंग्यू या आजाराची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अद्यापही डासांचे प्रमाण मुंबईत मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे होणारे आजार नागरिकांना होत आहे, त्यामुळे घराभोवतालची डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्याचे आवाहन महापालिकेने केली आहे.
महापालिकेतर्फे धूरफवारणी आणि अन्य माध्यमाचा उपयोग करून शहरातील डासांचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र तरीही या डासामुळे होणारे आजार मुंबईकरांना छळत आहेत. दर आठवड्याला महापालिकेचा आरोग्य विभाग साथीच्या आजाराची माहिती जाहीर करत असतो. गेल्या आठवड्यात सुद्धा मलेरिया आणि डेंग्यू या आजराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली होती. या आठवड्यातही त्याच पद्धतीचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, अनेकांना खोकला, ताप, सर्दी या आजराची लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे काही वेळा रुग्णांचा ओढा रक्त तपासणी करून घेण्यासाठी अधिक असल्याचे दिसत आहे. रुग्ण आणि नातेवाईक स्वतःहून रक्ताची तपासणी करून घेण्यासाठी डॉक्टरांना विचारणा करत आहे.
कोणती लक्षणे दिसतात?डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती या प्रजाती डेंग्यू पसरविण्यास कारणीभूत ठरत असतात. या आजारात तापामुळे काही जणांना हाडे आणि स्नायूंत खूप वेदना जाणवत असतात. त्यासोबत डोकेदुखी, मळमळ, अंगावर लाल पुरळ येणे अशी लक्षणे दिसू शकतात. या आजारात रुग्णाला त्याची लक्षणे पाहून औषधे दिली जातात. जर रुग्णाची प्रकृती गंभीर असेल तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.
मलेरिया आजाराची लक्षणे कोणती ?थंडी वाजून ताप येणे. ...ताप येतो आणि जातो.संध्याकाळी ताप येतो. ...सांधेदुखी, डोकेदुखी तसेच थकवा जाणवणे.१ ते १५ ऑक्टोबर रुग्णसंख्यामलेरिया - ४१८लेप्टो - २१डेंग्यू - ४१२गॅस्ट्रो - १७९हिपॅटायटिस - २४चिकुनगुनिया - १३स्वाइन फ्लू - ३०
(स्रोत - मुंबई महानगर पालिका आरोग्य विभाग )