मुंबई : स्टेंटच्या किमती नियंत्रणात आल्याने स्टेंटची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका रूग्णांना बसतो आहे. याची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईतील विविध रूग्णालयांत जाऊन स्टेण्टच्या उपलब्ध असल्याची माहिती घेतली. त्यानुसार रूग्णालयांमध्ये पुरेसा प्रमाणात स्टेंटचा साठा असल्याचे स्पष्टीकरण प्रसिद्ध पत्रकाद्वारे एफडीएने दिले आहे.तर स्टेंट उपलब्ध होत नसेल, स्टेंटच्या टंचाईचा फटका बसत असेल तर रुग्णांना थेट अन्न व औषध प्रशासनशी संपर्क साधण्याचे आवाहनही अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. त्यानुसार रूग्णांना वा त्यांच्या नातेवाईकांना स्टेंटसाठी १८००२२२३६५या हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल. तर ०२२-२६५९२३६३-६५, ०२२-२६५९०६८६ या क्रमांकावरून थेट सहआयुक्त (औषध) बृहन्मंबई, विनिता थॉमस यांच्याशीही थेट संपर्क साधता येईल. (प्रतिनिधी)
स्टेंट्सचा पुरेसा साठा उपलब्ध - एफडीए
By admin | Published: February 20, 2017 6:49 AM