‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ याचा जव्हारमध्ये प्रत्यय
By admin | Published: June 20, 2014 10:55 PM2014-06-20T22:55:50+5:302014-06-20T22:55:50+5:30
पंचायत समिती, जव्हार व कुटीर रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती जव्हारच्या मीटिंग सभागृहात नुकतेच रक्तदान शिबिर झाले.
Next
>जव्हार : पंचायत समिती, जव्हार व कुटीर रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती जव्हारच्या मीटिंग सभागृहात नुकतेच रक्तदान शिबिर झाले. रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याचा त्यांनी प्रत्यय आणला.
कुटीर रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांनी रूग्णालयातील रक्तपेढीमध्ये फक्त एकच पिशवी रक्त शिल्लक असल्यामुळे, त्यांनी जव्हार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सावंत यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती सांगितली. त्याचवेळी सावंत यांनी तातडीने निर्णय घेऊन पंचायत समिती, जव्हार येथील कर्मचारी आणि ग्रामसेवक यांची बैठक बोलवून रक्तदान शिबिराचे आयोजन केले. त्यांच्या या प्रय}ांमुळे एकूण 27 कर्मचा:यांनी प्रत्येकी 5क्क् एम. एल. रक्तदान केले. त्यामुळे एका दिवसात जव्हार येथील रक्तपेढीत साठा उपलब्ध झाला आहे.
जव्हार हा अतिदुर्गम आदिवासी तालुका असल्यामुळे येथील रूग्णांना उपचाराकरिता एकच पर्याय म्हणून कुटीर रूग्णालय असतो, त्यामुळे जव्हार कुटीर रूग्णालयात मोठय़ाप्रमणात रूग्णांवर उपचार केला जातो. अशा वेळी कित्येक वेळा रक्ताचा वापर करावा लागतो आणि रक्त शिल्लक नसल्यास त्या रूग्णाला नाशिक किंवा ठाण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळेस एकतर परिस्थिती चांगली असल्यास रूग्ण रक्त उपलब्ध करू शकतो, परंतु परिस्थिती बिकट असल्यास त्याला मृत्यूला तोंड द्यावे लागत असल्याने उपक्रम आवश्यक आहेत. शिबिरात सहभागी झालेल्या 27 कर्मचा:यांना शासनाकडून रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कुटीर रूग्णालयातील डॉक्टरांची टीम, नर्स, कर्मचारी, तसेच पं. स. सभापती तुळशीराम मोरघा, उपसभापती तान्ही भोरे, गटविकास अधिकारी सावंत, ग्रामसेवक मिलिंद गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)