शिधावाटप दुकानातून साखर गायब
By admin | Published: July 2, 2014 12:22 AM2014-07-02T00:22:56+5:302014-07-02T00:22:56+5:30
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासोबत चिक्की देण्यात येणार असून शाळा न.२८ मध्ये चिक्कीसोबत शैक्षणिक साहित्याचे वाटप स्थायी समिती सभापती राजश्री चौधरी यांच्या हस्ते झाले आहे
उल्हासनगर : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासोबत चिक्की देण्यात येणार असून शाळा न.२८ मध्ये चिक्कीसोबत शैक्षणिक साहित्याचे वाटप स्थायी समिती सभापती राजश्री चौधरी यांच्या हस्ते झाले आहे. चिक्कीसाठी पालिका अडीच कोटी रुपये खर्च करणार आहे.
उल्हासनगर महापालिका स्थायी समितीने पालिका शाळेतील मुलांसाठी दुपारच्या जेवणाबरोबर चिक्की देण्याच्या ठरावाला मंजुरी दिली आहे. पालिका शिक्षण मंडळांतर्गत विविध माध्यमाच्या २८ शाळा असून शाळेत साडेआठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
पालिका शाळेकडे मुले आकर्षित करण्यासाठी दुपारच्या जेवणाबरोबर चिक्की देण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याची प्रतिक्रिया आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिली आहे. शिक्षण मंडळाची कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर शिक्षण मंडळाचा
कारभार पालिका आयुक्तांच्या अधिकारांतर्गत आला असून, मंडळातील सावळ्या गोंधळावर पालिका आयुक्त जालीम उपाय शोधतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच पालिका शाळेला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देणार का, असा सवालही नागरिकांसह नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
पालिका शाळा नं.२८ मध्ये शालेय शैक्षणिक साहित्य व चिक्की वाटपाचा कार्यक्रम पार पडला असून शाळेतील मुलांना शालेय पोषक आहारासोबत चिक्की देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला उपमहापौर जमनुदास पुरस्वानी, स्थायी समिती सभापती राजश्री चौधरी, नगरसेविका वसुधा बोडारे, मंडळाच्या प्रभारी लेखापाल नीलिम कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त खतगावकर यांनी शाळा दुरुस्ती, विद्यार्थीसंख्या वाढविणे, मुलांना बसण्यासाठी बेंचेस देणे, मंडळातील गैरकारभाराची चौकशी करून त्याला आळा घालण्याची गरज असल्याचे मत याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)