Join us

शिधावाटप दुकानातून साखर गायब

By admin | Published: July 02, 2014 12:25 AM

डोंबिवली पूर्व-पश्चिम विभागात असणाऱ्या शिधावाटप दुकानातून साखर गायब झाल्यामुळे लोकांना बाहेरून जास्त भावाने साखर घ्यावी लागत आहे

नांदिवली : डोंबिवली पूर्व-पश्चिम विभागात असणाऱ्या शिधावाटप दुकानातून साखर गायब झाल्यामुळे लोकांना बाहेरून जास्त भावाने साखर घ्यावी लागत आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून साखर मिळत नसल्यामुळे ग्राहकांची यामुळे घोर निराशा होत आहे. याबाबत पूर्व विभागातील शिधावाटप कार्यालयात अधिकारी अनघा तोरसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी साखर नसल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला.डोंबिवली शहरात पूर्व-पश्चिम विभागात वेगवेगळी कार्यालये आहेत. शहरात असणाऱ्या दुकानावर नियंत्रण ठेवले जाते. पश्चिम विभगात केशरी कार्डधारक ३८ हजार, शुभ्र १५००० तर बी.पी.एल. (दारिद्र्यरेषेखाली) ७०० तर अंत्योदय योजनेखाली ११० कार्डधारक आहेत. पूर्व विभागात केशरी ७५ हजार, शुभ्र २७ हजार, बीपीएल २२८०, तर अंत्योदयखाली सुमारे ११०० कार्डधारक आहेत. विशेष म्हणजे शुभ्र आणि केशरी कार्डधारकांना शिधावाटप दुकानातून काही मिळत नाही. पाच महिन्यांपासून बीपीएल कार्डधारकांना रेशनवर साखर मिळत नाही. त्यामुळे या कार्डधारकांना नाहक जास्त भावाने खुल्या बाजारातून साखर घ्यावी लागत आहे. (वार्ताहर)