मुंबई : पॅरिस करारांतर्गत राष्ट्रीय योगदानाच्या नावे ओळखल्या जाणाºया भारताच्या राष्ट्रीय हवामान कृती योजनेच्या उद्दिष्टांनुसार, प्रदूषणविरहित अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासह या प्रकल्पांमध्ये सौरऊर्जेचा मोठा सहभाग करून घेतला जात आहे. याअंतर्गत राज्यात उसाचे चिपाड, कृषी अवशेष, कचºयासारख्या स्रोतांपासून ऊर्जानिर्मिती केली जात असून, प्रकल्पाची एकूण क्षमता ९ हजार ५८७.५७३ मेगावॅट आहे. पॅरिस करार हा महत्त्वाचा पर्यावरणीय करार आहे. २०१५ मध्ये हवामानातील बदल आणि त्याचे परिणाम टाळण्यासाठी जवळपास प्रत्येक देशाने हा करार स्वीकारला आहे. करारामध्ये सर्व मोठ्या उत्सर्जक देशांना प्रदूषण कमी करण्यास सांगण्यात आले आहे.>आस्थापित क्षमता मेगावॅटमध्येपवन ऊर्जा प्रकल्प : ४९९८.२१उसाच्या चिपाडावर आधारित सहवीजनिर्मिती प्रकल्प : २३०१.३०कृषी अवशेषांवर आधारित प्रकल्प : २१५.००लघुजल विद्युत प्रकल्प : ३७०.०२५शहरी घन व द्रव कचºयापासून वीजनिर्मिती : ३.००औद्योगिक कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्प : ३७.८३८सौर फोटोव्होल्टाईक वीजनिर्मिती : १६६२.२०एकूण : ९५८७.५७३
उसाचे चिपाड, कचऱ्यासारख्या स्रोतांपासून ऊर्जानिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 2:49 AM