Join us

अडीच लाख मूषकांचा संहार, घर, इमारतींमध्ये मूषकरोधक बसविण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 6:22 AM

मंत्रालयाची झोप उडविणाऱ्या उंदरांनी मुंबईतही अनेक भागांमध्ये नागरिकांना हैराण केले आहे. उंदीर आणि घुशींबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींनुसार २०१७मध्ये महापालिकेने दोन लाख ४८ हजार उंदीर व घुशींना हुडकून मारले आहे.

मुंबई : मंत्रालयाची झोप उडविणाऱ्या उंदरांनी मुंबईतही अनेक भागांमध्ये नागरिकांना हैराण केले आहे. उंदीर आणि घुशींबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींनुसार २०१७मध्ये महापालिकेने दोन लाख ४८ हजार उंदीर व घुशींना हुडकून मारले आहे.मुंबईतील जुन्या इमारती व चाळींच्या भिंतींना उंदीर आणि घुशींनी मोठ्या प्रमाणात बिळे पाडली आहेत. त्यामुळे या इमारती व चाळींना धोका निर्माण झाला असल्याने उंदीर आणि घुशींना आळा घालण्यासाठी महापालिकेने ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. उंदीर आणि घुशींचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. याप्रकरणी त्यांनी पालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रारीही केल्या होत्या. त्याची दखल घेत २०१७ मध्ये दोन लाख ४८ हजार उंदरांचा बंदोबस्त करण्यात आला.अस्वच्छता व अन्न पदार्थ सहज उपलब्ध होणाºया परिसरात उंदरांचे प्रमाण वाढते. त्यांची संख्या कमी करण्यासाठी नागरिकांनी आणि चाळ कमिटीने परिसरात स्वच्छता राखावी, स्वयंपाकघरात तसेच परिसरात जमा होणारा कचरा कचराकुंडीतच टाकावा, उंदरांची उपासमार व्हावी म्हणून उघड्यावर खाद्यपदार्थ मिळणार नाहीत याची काळजी घ्यावी, घर, इमारतींमध्ये मूषकरोधक बसवावेत अशा सूचना महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिल्या आहेत.>दोन वर्षांत मारलेले उंदीर२०१६मध्ये वर्षभरात दोन लाख दहा हजार ७३७ उंदीर, तर २०१७मध्ये दोन लाख ४८ हजार उंदरांना ठार मारले आहे. या कालावधीत महापालिकेकडे उंदीर आणि घुशींबाबत १० हजार ५५१ तक्रारी आल्या.>उपद्रव थांबविण्यासाठी उपाययोजनाउंदीर आणि घुशी हे सस्तन प्राण्यांमध्ये गणले जातात. गर्भधारणेनंतर २१ ते २२ दिवसांत मादी उंदीर ५ ते १४ पिल्लांना जन्म देते.उंदरांचे आयुर्मान साधारणपणे १८ महिन्यांचे असते. एका उंदराच्या जोडीमुळे १५ हजार नवीन उंदीर तयार होतात.पालिकेकडून मूषक नियंत्रणासाठी २३ कनिष्ठ अवेक्षक,१३ मूषक नियंत्रण कामगार, ३१ रात्रपाळी मूषक संहारक कार्यरत आहेत.मूषक सापळा लावणे, विषारी गोळ्या टाकणे, बिळांमध्ये गोळ्या टाकून वाफारणी करणे, रात्रीच्या वेळी काठीने उंदीर मारणे या चार पद्धतीने उंदीर आणि घुशींना आळा घातला जात आहे.