सुसाट तिहेरी मार्गाचा तांत्रिक तिढा सुटला
By admin | Published: November 26, 2014 02:17 AM2014-11-26T02:17:25+5:302014-11-26T02:17:25+5:30
मुंबईतल्या सुसाट अशा तिहेरी मार्गाचा तांत्रिक तिढा सुटला आहे. मध्य रेल्वेने मंगळवारी ईस्टर्न फ्री-वेला बीकेसीशी जोडणा:या उड्डाणपुलाच्या आराखडा दुरुस्तीला मंजुरी दिली.
Next
मुंबई : मुंबईतल्या सुसाट अशा तिहेरी मार्गाचा तांत्रिक तिढा सुटला आहे. मध्य रेल्वेने मंगळवारी ईस्टर्न फ्री-वेला बीकेसीशी जोडणा:या उड्डाणपुलाच्या आराखडा दुरुस्तीला मंजुरी दिली. यामुळे सध्या धावत असलेली रेल्वे आणि त्यावरून बीकेसी-ईस्टर्न फ्री-वे आणि त्याहीवरून पनवेल-सीएसटी फास्ट कॉरीडोर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शीव तसेच चुनाभट्टी स्थानकावरून एमएमआरडीएचा उड्डाणपूल जाणार असून, यामध्ये चुनाभट्टी स्थानकात असलेले फाटक बंद केले जाणार आहे.
एमएमआरडीए बीकेसी ते ईस्टर्न फ्री-वेवर 1.6 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधणार असून, हा पूल मध्य रेल्वेच्या हद्दीत येत आहे. मध्य रेल्वेच्या शीव ते कुर्लादरम्यान उड्डाणपुलाचा विस्तार 52.8 मीटर रुंद तर चुनाभट्टीमध्ये पुलाचा 60 मीटर विस्तार होणार आहे. येथील फाटक बंद केले जाणार आहे.
त्यामुळे यावर मध्य रेल्वेच्या बैठकीत एमएमआरडीए आणि एमआरव्हीसीशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिवडी ते न्हावा शेवा ट्रान्स हार्बरशी जोडण्यासाठी बीकेसी ते ईस्टर्न फ्री-वेवर 1.6 मीटर लांबीचा पूल बांधणो गरजेचे आहे. त्यासाठी आराखडय़ाची मंजुरी घेणो एमएमआरडीएला आवश्यक होते. त्यानुसार ही मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर सध्या धावत असलेली मध्य रेल्वे आणि त्यावरून जाणारा बीकेसी-ईस्टर्न फ्री-वेचा उड्डाणपूल आणि त्यावरूनही जाणारा फास्ट कॉरीडोर प्रकल्पात किती अंतर असावे हेदेखील ठरवण्यात आले.
मध्य रेल्वेवर एमआरव्हीसीचा सीएसटी-पनवेल फास्ट कॉरीडोर प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे पनवेलचा प्रवास सुसाट होणार आहे. सध्या 77 मिनिटांत प्रवास होतो. हा कॉरीडोर झाल्यास अवघ्या 45 मिनिटांत प्रवास होणार आहे. प्रकल्पाचा खर्च 11 ते 12 हजार कोटी रुपये आहे. मात्र या सर्व तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प राबवताना समस्या येत होत्या.