आरोपीची पोलीस ठाण्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 06:05 AM2017-08-18T06:05:25+5:302017-08-18T06:05:34+5:30

संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत गुरुवारी घडला.

Suicide of the accused police station | आरोपीची पोलीस ठाण्यात आत्महत्या

आरोपीची पोलीस ठाण्यात आत्महत्या

Next

मुंबई : संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत गुरुवारी घडला. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिक तपास करत आहे.
विजय रमेश साळवी (२०) असे गळफास घेणाºयाचे नाव आहे. त्याला १७ आॅगस्ट रोजी अंधेरी पोलिसांनी फसवणूक आणि संगनमत या कलमांखाली गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. अंधेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी त्याची चौकशी सुरू होती. त्या वेळी जवळपास कोणीच नसताना त्याने त्याच्या बनियनने पोलीस ठाण्यातच गळफास घेतला. दुपारी १२च्या सुमारास हा प्रकार घडला. अंधेरी पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांनी हा प्रकार पहिला आणि वरिष्ठांना कळविले. त्यानंतर त्याला स्थानिक क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. त्यातूनच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
या घटनेबाबत समजताच परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी व अन्य वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र हा प्रकार लॉकअपमध्ये घडला की डिटेक्शन रूममध्ये, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. चौकशी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Suicide of the accused police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.