महसूलमंत्र्यांच्या बंगल्यात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 02:36 AM2021-03-12T02:36:45+5:302021-03-12T02:37:13+5:30

वाघ यांनी २०१७ मध्ये एक जमीन शेतीसाठी घेतली होती.

Suicide attempt of a farmer in the bungalow of the revenue minister | महसूलमंत्र्यांच्या बंगल्यात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

महसूलमंत्र्यांच्या बंगल्यात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अल्टामाऊंट रोड येथील रॉयल स्टोन बंगल्यात अहमदनगरच्या पांडुरंग वाघ या शेतकरी तरुणाने मंगळवारी (दि. ९) अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तेथील सुरक्षारक्षकांनी त्याला अडवून ताब्यात घेतले. गावदेवी पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करून त्यांना गावी पाठवले.

वाघ यांनी २०१७ मध्ये एक जमीन शेतीसाठी घेतली होती. नदीलगतच्या जमिनीतील वाळू उपशाची सरकारकडे परवानगी मागितली. ८ लाख ७२ हजार रुपये भरून २०१८ मध्ये परवाना मिळवला. मात्र स्थानिकांनी विरोध केला. अखेर, पैसे परत मिळावेत म्हणून, पाठपुरावा सुरू केला. मदतीसाठी मंगळवाऱी ते थोरात यांच्या बंगल्याकडे आले. बंगल्याच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात जाऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला.

Web Title: Suicide attempt of a farmer in the bungalow of the revenue minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी