पोलिसांची उडाली तारांबळ; मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 06:17 PM2019-09-18T18:17:56+5:302019-09-18T18:21:31+5:30

पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून मंत्रालयात खळबळ माजली होती. 

Suicide attempt of teachers in mantralaya from 2nd floor | पोलिसांची उडाली तारांबळ; मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न 

पोलिसांची उडाली तारांबळ; मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न 

Next
ठळक मुद्देया जाळीमुळे उडी मारलेले हेमंत पाटील आणि अरुण वेतोरे यांचा जीव वाचला.विनाअनुदानित दिव्यांग शाळांना अनुदानित घोषित करण्यासंदर्भात हे शिष्टमंडळ मंत्रालयात आलं होतं.

मुंबई - मंत्रालयात दिव्यांग शिक्षकांचे शिष्टमंडळ मंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते. मात्र, संबंधित मंत्र्यांची भेट न झाल्याने दोन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंत्रालयात पहिल्यांदाच घडली असून याआधी देखील अशा घटना घडल्या आहेत. विनाअनुदानित दिव्यांग शाळांना अनुदानित घोषित करण्यासंदर्भात हे शिष्टमंडळ मंत्रालयात आलं होतं. मात्र, मंत्र्यांची भेट न झाल्याने संतापलेल्या दोघांनी मंत्रालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. मंत्रालयात असे प्रकार घडले असल्यामुळे पूर्वकाळजी घेत मंत्रालयात जाळी लावण्यात आली आहे. या जाळीमुळे उडी मारलेले हेमंत पाटील आणि अरुण वेतोरे यांचा जीव वाचला. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून मंत्रालयात खळबळ माजली होती. 

दिव्यांग, अपंग कायम विना अनुदानशाळांना अनुदान देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ
दोन शाळाचालक कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या व्हरांड्यात जाळ्या  बांधलेल्या असल्याने ते बचावले. मात्र, या प्रकारामुळे परिसरात मोठी धावपळ व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. 
हेमंत पाटील (रा. चाळीसगाव, जळगाव ) अरुण नेटोरे (रा. उस्मानाबाद )असे उडी मारलेल्या शाळा चालकाचे नांव आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यात दिव्यांग, अपंगाच्या कायम विनाअनुदानित 300 वर शाळा आहेत, गेल्या 10, 12 वर्षांपासून काम करीत आहेत. मात्र, त्यांना काहीही अनुदान मिळत नाही. त्यासाठी यावर काम करीत असलेल्या 4, 5 शाळाचालकाचे प्रतिनिधी गेल्या तीन दिवसापासून मंत्रायालयात शिक्षणमंत्री व अधिकाऱ्याना भेटण्यासाठी आले होते. मंगळवारी शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेवेळी त्यांना पुढच्या अधिवेशनावेळी प्रस्ताव मांडू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज ते परत मंत्रालयात अधिकाऱ्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी निराश होऊन सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील  सरकत्या जिन्याजवळ  येवून शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत जाळ्यावर उड्या मारल्या. दोघे जाळीवर पडून घोषणा देत होते. या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलीस जाळीवर उतरले. त्यांनी दोघांना बाहेर काढून ताब्यात घेतले. यानंतर खाली जमलेल्या त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत मंत्रालयाचा परिसर दणाणून सोडला. उडी मारलेल्यांचा जबाब नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Web Title: Suicide attempt of teachers in mantralaya from 2nd floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.