दिव्यांग शाळेच्या दोघा चालकांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 05:43 AM2019-09-19T05:43:33+5:302019-09-19T05:43:37+5:30

दोघा शाळाचालक कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी मंत्रालयात दुस-या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Suicide bomber attempts suicide in ministry | दिव्यांग शाळेच्या दोघा चालकांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

दिव्यांग शाळेच्या दोघा चालकांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

Next

मुंबई : दिव्यांग, अपंग कायम विनाअनुदान शाळांना अनुदान देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ दोघा शाळाचालक कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी मंत्रालयात दुस-या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या व्हरांड्यात जाळ्या बांधलेल्या असल्याने ते बचावले. हेमंत पाटील (रा. चाळीसगाव, जळगाव), अरुण नेटोरे (रा. उस्मानाबाद) असे उडी मारलेला शाळा चालकाचे नाव आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज्यात दिव्यांग, अपंगाच्या कायम विनाअनुदानित ३००हून अधिक शाळा आहेत. गेल्या १२ वर्षांपासून शाळाचालक कर्मचारी तेथे काम करीत आहेत. मात्र, त्यांना काहीही अनुदान मिळत नाही, त्यासाठी यावर काम करीत असलेल्या चार ते पाच शाळाचालकांचे प्रतिनिधी गेल्या तीन दिवसांपासून मंत्रालयात शिक्षणमंत्री व अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते.
मंगळवारी शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेवेळी त्यांना पुढच्या अधिवेशनावेळी प्रस्ताव मांडू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर, बुधवारी ते परत मंत्रालयात अधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्यांनी निराश होऊन सायंकाळी पाचच्या सुमारास दुसºया मजल्यावरील सरकत्या जिन्याजवळ येऊन शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत जाळ्यावर उड्या मारल्या. दोघे जाळीवर पडून घोषणा देत होते. तेव्हा या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलीस जाळीवर उतरले, त्यांनी दोघांना बाहेर काढत ताब्यात घेतले. यानंतर, खाली जमलेल्या त्यांच्या अन्य सहकाºयांनी घोषणाबाजी करीत मंत्रालयाचा परिसर दणाणून सोडला. दरम्यान, उडी मारल्याचा जबाब नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Suicide bomber attempts suicide in ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.