नायर रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या, कौटुंबिक कारणातून जीवन संपविल्याचा प्राथमिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 06:03 AM2021-02-17T06:03:14+5:302021-02-17T06:03:35+5:30

Suicide of a doctor at Nair Hospital : कौटुंबिक कारणावरून त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Suicide of a doctor at Nair Hospital, a preliminary estimate of the end of life due to family reasons | नायर रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या, कौटुंबिक कारणातून जीवन संपविल्याचा प्राथमिक अंदाज

नायर रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या, कौटुंबिक कारणातून जीवन संपविल्याचा प्राथमिक अंदाज

Next

मुंबई : येथील नायर रुग्णालयात कार्यरत एका तरुण डॉक्टरने राहत्या घरी स्वत:ला विषारी इंजेक्शन टाेचून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना साेमवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास घडली. डॉ. भीमसंदेश प्रल्हाद तुपे (वय २८) असे त्यांचे नाव असून, त्यांच्या या कृत्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक कारणावरून त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डॉ. तुपे हे मूळचे औरंगाबादचे  असून भूलशास्त्र (अनॅस्थेशिया) या विषयात पदव्युत्तर  शिक्षणासाठी मुंबईला आले होते. नायर हॉस्पिटल परिसरात निवासी इमारतीच्या नवव्या मजल्यावरील ९३० क्रमांकाच्या खोलीमध्ये ते राहत होते. साेमवारी रात्री  साडेदहाच्या सुमारास त्यांनी स्वत:ला इंजेक्शन टाेचून घेऊन आत्महत्या केली. थोड्या वेळानंतर त्यांचे मित्र तेथे आले असता डॉ. तुपे बेशुद्धावस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत आग्रीपाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरच्यांशी मतभेदामुळे टोकाचे पाऊल
डॉ. तुपे अविवाहित होते. लग्नाच्या कारणावरून घरच्यांशी त्यांचे मतभेद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. 
त्यांच्या खोलीत इंजेक्शनच्या सिरींज वगळता सुसाइड नोट अथवा अन्य काहीही सापडलेले नाही. 
याप्रकरणी त्यांचे संबंधित सहकारी व इतरांचे जबाब नाेंदविण्यात येत असल्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक श्रीराम कोरगावकर यांनी सांगितले.    

Web Title: Suicide of a doctor at Nair Hospital, a preliminary estimate of the end of life due to family reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.