बाराव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची सात महिन्यांच्या मुलासह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:06 AM2021-06-23T04:06:07+5:302021-06-23T04:06:07+5:30

मुंबई : अंधेरीच्या साकीनाका परिसरात सोमवारी रेश्मा त्रेंचिल (४४) या महिलेने तिचा सात महिन्यांचा मुलगा गरूड याच्यासह इमारतीच्या बाराव्या ...

Suicide of a married woman with a seven-month-old child by jumping from the twelfth floor | बाराव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची सात महिन्यांच्या मुलासह आत्महत्या

बाराव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची सात महिन्यांच्या मुलासह आत्महत्या

Next

मुंबई : अंधेरीच्या साकीनाका परिसरात सोमवारी रेश्मा त्रेंचिल (४४) या महिलेने तिचा सात महिन्यांचा मुलगा गरूड याच्यासह इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. कोरोनाने पतीचा मृत्यू झाल्यानंतर निराशेत त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सूत्रांचे म्हणणे असून त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांनी हस्तगत केली आहे. चांदिवलीच्या नहर अमृत रोडवरील तुलिपिया इमारतीत हा प्रकार घडला.

शरद मुलूकुट्ला असे रेश्मा यांच्या पतीचे नाव होते. ते एका ऑनलाइन ट्रेडिंग विभागात प्रमुख म्हणून कार्यरत होते. रेश्मा या गृहिणी असून शरदच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या सेवेसाठी ते वाराणसीला गेले. दुर्दैवाने त्यांनाही कोरोना झाला आणि चार आठवडे मृत्यूशी त्यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली. त्यामुळे रेश्मा यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर सोमवारी रेश्मा यांनी हे पाऊल उचलले. त्यांनी फेसबुकवर ३० मे, २०२१ रोजी पोस्ट टाकली होती. ज्यात शरदशिवाय जगणे किती असह्य आहे, याचा उल्लेख केला होता. त्यांच्या पोस्टवरून पतीला गमावल्याचे दुःख त्या सहन करू शकत नव्हत्या आणि परिणामी त्यांनी मृत्यूला कवटाळले, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सुसाइड नोट सापडली

संबंधित महिला आणि तिच्या मुलाचा मृत्यू यात कोणतीही संशयास्पद बाब अद्याप समोर आली नसून ती आत्महत्याच असल्याचे उघड झाले आहे. आम्हाला त्यांनी लिहिलेली सुसाइड नोट सापडली असून अधिक चौकशी सुरू आहे.

- महेश्वर रेड्डी, उपायुक्त, परिमंडळ १०

Web Title: Suicide of a married woman with a seven-month-old child by jumping from the twelfth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.