नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, जसलोकच्या वसाहतीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 03:31 AM2017-09-03T03:31:07+5:302017-09-03T03:31:15+5:30
जसलोक वसाहतीच्या शौचालयात बीएससी नर्सिंगच्या २६ वर्षीय विद्यार्थिनीने शनिवारी गळफास घेत आत्महत्या केली. नारायणी अवस्थी असे तिचे नाव आहे.
मुंबई : जसलोक वसाहतीच्या शौचालयात बीएससी नर्सिंगच्या २६ वर्षीय विद्यार्थिनीने शनिवारी गळफास घेत आत्महत्या केली. नारायणी अवस्थी असे तिचे नाव आहे. अभ्यासक्रमात अपेक्षेप्रमाणे गुण मिळत नसल्याच्या तणावातून नारायणीने हे पाऊल उचलल्याचा अंदाज रुग्णालय प्रशासनाने वर्तविला आहे. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.
गावदेवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१३ मध्ये नारायणी मुंबईत आली. २०१४ मध्ये तिने जसलोकमध्ये प्रवेश घेतला. ती बीएससी नर्सिंगच्या तिसºया वर्षाचे शिक्षण घेत होती. येथीलच वसाहतीतील तिसºया मजल्यावर पाच सहकाºयांसोबत राहायची. याच वेळी तिने वाडिया आणि मसिना रुग्णालयात प्रशिक्षण घेतले होते.
शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास नारायणीच्या सहकारी मैत्रिणीला जाग आली. तेव्हा नारायणी अस्वस्थ असल्याचे तिला जाणवले. तिने याबाबत तेथील वॉर्डनला कळविले व ती निघून गेली. तेथील अधिकाºयांनी नारायणीची विचारपूस केली. साडेनऊला सफाई कामगार महिला तिच्या खोलीकडे आली. नारायणी शौचालयात होती. १५ मिनिटांनी तिने नारायणीला आवाज दिला. तेव्हा आतून काहीच प्रतिसाद न आल्याने शौचालायचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा नारायणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
निराशेतून उचलले पाऊल?
‘नारायणीच्या आत्महत्येमुळे आम्हालाही धक्का बसला आहे. तिला अपेक्षेप्रमाणे परीक्षेत गुण मिळत नसल्याने ती निराश झाली होती. याच तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे,’ असे जसलोकच्या प्राचार्या मंगलम यांनी सांगितले. तर गावदेवी पोलिसांनी नारायणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. घटनास्थळावरून सुसाइड नोट मिळाली असून यात तिने थेट कुणावरही आरोप केलेला नाहीा.