एअर होस्टेसच्या मारेकऱ्याची आत्महत्या; अंधेरी पोलिस ठाण्यातील तुरुंगात लावून घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 06:10 AM2023-09-09T06:10:27+5:302023-09-09T06:10:57+5:30

पाण्याच्या पाइपलाइनला अटवालने गळफास घेतल्याचे दिसून आले.

Suicide of Air Hostess Killer; Hanged himself in Andheri police station jail | एअर होस्टेसच्या मारेकऱ्याची आत्महत्या; अंधेरी पोलिस ठाण्यातील तुरुंगात लावून घेतला गळफास

एअर होस्टेसच्या मारेकऱ्याची आत्महत्या; अंधेरी पोलिस ठाण्यातील तुरुंगात लावून घेतला गळफास

googlenewsNext

मुंबई : प्रशिक्षणार्थी हवाईसुंदरी रुपल ओग्रे हिचा अंधेरी येथील घरात गळा चिरून हत्या करणारा आरोपी विक्रम अटवाल (४०) याने शुक्रवारी पहाटे अंधेरी पोलिस ठाण्यातील तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटवाल याला अटक केल्यानंतर पुढील तपासासाठी पवई पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अंधेरी तुरुंगातील स्वच्छतागृहात अटवाल गेला हाेता. 

पाण्याच्या पाइपलाइनला अटवालने गळफास घेतल्याचे दिसून आले. गळफास लावून घेण्यासाठी त्याने स्वत:च्या पँटचा वापर केला, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विक्रम अटवालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. 
स्वच्छतागृहातून बराच वेळ अटवाल बाहेर न आल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला परंतु, आतून काहीच प्रतिसाद न आल्याने स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडण्यात आला. 

तो शांत झाला... रडणेही थांबले

पोलिस सूत्रांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटवालला अटक केल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. दोन दिवसांनंतर त्याच्या वागणुकीत कमालीचा बदल झाला, कारण तो शांत झाला. तसेच कोठडीत असताना त्याचे रडणेही थांबले. त्याने त्याची पत्नी आणि दोन मुलांचाही उल्लेख केला, ज्यांचे वय एक आणि दहा वर्षे आहे.

Web Title: Suicide of Air Hostess Killer; Hanged himself in Andheri police station jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.