बोरिवलीत अल्पवयीन तरुणीची आत्महत्या; लग्न लावून न दिल्याच्या रागातून टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 05:29 AM2022-12-26T05:29:59+5:302022-12-26T05:30:33+5:30

बोरिवलीत एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे.

suicide of minor girl in borivali an extreme step from the anger of not getting married | बोरिवलीत अल्पवयीन तरुणीची आत्महत्या; लग्न लावून न दिल्याच्या रागातून टोकाचे पाऊल

बोरिवलीत अल्पवयीन तरुणीची आत्महत्या; लग्न लावून न दिल्याच्या रागातून टोकाचे पाऊल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :बोरिवलीत एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. घरच्यांनी लग्न लावून न दिल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी ही बोरिवलीच्या एल. टी. रोड परिसरात राहण्यास होती. तिचे दोन महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार कुटुंबीयांसाठी हे लग्न अडचणीचे ठरणार होते. त्यामुळेच कटुंबीयांनी मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर लग्न लावून देण्याचे ठरविले. दोन महिन्यांनंतर तिला १८ वर्षे पूर्ण होणार होते. 

पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, घरचे लग्नासाठी विलंब करीत आहेत, या गोष्टीमुळे तिला राग आला. अखेर मुलीने शुक्रवारी, २३ डिसेंबरला घरात कोणी नसताना स्वयंपाकघरात गळफास घेत आत्महत्या केली. स्थानिकांनी याप्रकरणी बोरिवली पोलिसांना कळविले. तेव्हा त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत मृतदेह विच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवला. त्याच्या अहवालाची सध्या प्रतीक्षा आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: suicide of minor girl in borivali an extreme step from the anger of not getting married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.