मुंबई : महिन्याभरापूर्वी चेंबूरमधील एका लॉजमध्ये कर्नाटक येथील एका सोने व्यापाऱ्याचा मृतदेह चेंबूर पोलिसांना आढळला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मात्र ही हत्या नसून मृताने स्वत:वरील कर्ज फेडण्यासाठी हत्येचा बनाव केल्याचे अखेर उघड झाले आहे. एस. सतीश (३७) असे या मृत व्यापाऱ्याचे नाव असून, तो केरळ येथे वास्तव्यास होता. केरळमधील सोने व्यापाऱ्यांकडून सोने घेत तो हे सोने मुंबईत विकत होता. त्यानुसार ९ जानेवारी रोजी तो मुंबईत आला होता. चेंबूर येथे कमला लॉजमध्ये तो वास्तव्यास होता. पण चार दिवसांनीही त्याच्या रूमचा दरवाजा बंद असल्याने लॉज मालकाने पोलिसांना माहिती दिली. चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेह ताब्यात घेतला. मात्र रूमच्या दरवाज्याला बाहेरून कुलूप असल्याने ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला. लॉजच्या परिसरातील सीसीटीव्हींचा तपास करताना एक संशयिताचा चेहरा निदर्शनास आला.पोलिसांनी केरळ येथे दाखल होत त्या व्यक्तीची चौकशी केली असता हा इसम रियाज कलमाउद्दीन असल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. त्यानंतर मार्टीन इरीराज आणि सर्वन कुमार याला अटक केली. (प्रतिनिधी)
कर्ज फेडण्यासाठी आत्महत्या
By admin | Published: February 09, 2017 5:03 AM