फेसबुकवरील त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

By admin | Published: June 15, 2017 03:09 PM2017-06-15T15:09:55+5:302017-06-15T15:11:49+5:30

फेसबुकवरील एका व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील महिलेचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर येते आहे.

Suicides of a woman on a Facebook page | फेसबुकवरील त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

फेसबुकवरील त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 15- फेसबुकवरील एका व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील महिलेचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर येते आहे. संचिता उर्फ नयना सुरेश वाघ (२१) हिचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं होतं. ज्यामुळे हॅकर तिच्याकडून शरीर सुखाची मागणी करत होता. म्हणून तिने आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  
 
फेसबुकवरुन होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून संचिताने आत्महत्या केल्याचं वृत्त "लोकमत" ने बुधवारी प्रकाशित केलं होतं. याप्रकरणी मिळालेल्या महितीनुसार, संचिताचं फेसबुक अकाऊंट हॅक करणारा तिच्या नावाने विविध लोकांना अश्लील मेसेज
पाठवत होता. त्यामुळे ती तणावात होती. तसंच जर हे सर्व थांबवायचं असेल तर तुला माझ्यासोबत शरीर संबंध ठेवावे लागतील, अशी धमकी त्याने दिली होती. ही गोष्ट संचितला मान्य नव्हती. त्यामुळे अखेरीस तिने आत्महत्येचा निर्णय घेतला. 
 
याप्रकरणी गेल्या महिन्यात म्हणजे ५ मे रोजी चारकोप पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली होती. ती तक्रार नंतर बीकेसीच्या सायबर सेलकडे वर्ग करण्यात आली. मात्र त्या हॅकरचा काहीच सुगावा पोलिसांना लागला नाही. संचिताची मावशी पोलीस खात्यात आहे. त्यामुळे आपणही पोलीस खात्यात भरती व्हावे अशी तिची इच्छा होती. पोलीस खात्यातील फिटनेस टेस्टमध्ये वजन जास्त असल्याने तिला अपयश आले. त्यानुसार वजन कमी करून ती पुन्हा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 
 
चारकोपच्या बंदर पकाडी रोडच्या , शिवशंकर चाळीत राहणाऱ्या संचिताच्या राहत्या घरी गळफास घेतल्याच्या अवस्थेत मृतदेह बुधवारी सापडला होता. ज्याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद चारकोप पोलिसांनी केली होती. 
 

Web Title: Suicides of a woman on a Facebook page

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.