सुकेशने हिरावला मुंबईचा विजय

By admin | Published: July 29, 2014 01:12 AM2014-07-29T01:12:08+5:302014-07-29T01:12:08+5:30

शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात तेलगू टायटन्स संघाच्या सुकेश हेगडेने अखेरच्या चढाईमध्ये ३ खेळाडू बाद

Sukesh wins Mumbai's victory | सुकेशने हिरावला मुंबईचा विजय

सुकेशने हिरावला मुंबईचा विजय

Next

रोहित नाईक, मुंबई
शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात तेलगू टायटन्स संघाच्या सुकेश हेगडेने अखेरच्या चढाईमध्ये ३ खेळाडू बाद करीत मुंबईच्या विजयी हॅट्ट्रिकचे स्वप्न धुळीस मिळवताना प्रो कबड्डी लीगमधील पहिल्या अनिर्णित सामन्याची नोंद केली.
संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखलेल्या यू मुंबा संघाला अखेरच्या मिनिटामध्ये केलेल्या चुकीचा फटका बसला. कामालीच्या आत्मविश्वासाने खेळणारे मुंबईकर सहज विजय मिळवणार, असे दिसत होते. मात्र सुकेशने अखेरच्या चढाईमध्ये कमाल करताना ३ मुंबईकरांना बाद करीत सामन्याचा निकाल पूर्णपणे पलटवला. शब्बीर शरीफुद्दीन, कर्णधार अनुप कुमार यांनी आक्रमक चढाई करून मुंबईला ४-२ अशी सुरुवात करून दिली. यानंतर लगेच तेलगू संघाने बरोबरी साधल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईने वर्चस्व राखले.
१२ व्या मिनिटाला मुंबई संघावर लोणचे संकट असताना मुंबईकरांनी कमाल केली. पुन्हा एकदा अनुपने आक्रमणाची सूत्रे घेत मुंबईला मध्यंतराला १९-९ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर तेलगूच्या खेळाची आक्रमकता वाढली. २६व्या मिनिटाला राहुलने मुंबईच्या रिषांक आणि मोहित चिल्लरला बाद करीत तेलगू संघाची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर कमालीचे सातत्य राखलेल्या तेलगूने मुंबई संघावर लोण चढवताना २१-२५ असे पुनरागमन केले. लोन चढल्यानंतर मुंबईकरांनी आक्रमक पवित्रा घेत तेलगू संघावर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. त्याचवेळी मुंबईवर दुसरा लोन चढवण्याचा पराक्रम करताना तेलगू संघाने ३१-३१ अशी बरोबरी साधत आव्हान कायम ठेवले.
याचवेळी सामन्यातील मुख्य थरार रंगला. मुंबईचा हुकमी शब्बीरने बोनस गुणासह एक बळी मिळवताना मुंबईला २ गुणांची आघाडी मिळवून दिली. ४०व्या मिनिटाच्या सुरुवातीला मुंबईकडे ३५-३२ आघाडी होती. मात्र अखेरच्या मिनिटाला तेलगूच्या सुकेशने अप्रतिम चढाई करताना मोहित चिल्लर, सुरेंदर नादा आणि जीव गोपाल यांना बाद करून तेलगूला ३५-३५ अशी बरोबरी साधून देत मुंबईच्या हातातील सामना हिरावला.

Web Title: Sukesh wins Mumbai's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.