Join us

सुकन्यांचे स्वागत करणारा म्हाडा पतपेढीचा स्तुत्य उपक्रम :- उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 10:15 PM

म्हाडा कर्मचारी सहकारी पतपेढीतर्फे सुरू करण्यात आलेल्या सुकन्या स्वागत योजना व सुकन्या समाधान योजना हा एक स्तुत्य उपक्रम असून स्त्रीचा सन्मान करणारी योजना आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे माननीय अध्यक्ष उदय सामंत यांनी आज केले.

मुंबई- म्हाडा कर्मचारी सहकारी पतपेढीतर्फे सुरू करण्यात आलेल्या सुकन्या स्वागत योजना व सुकन्या समाधान योजना हा एक स्तुत्य उपक्रम असून स्त्रीचा सन्मान करणारी योजना आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे माननीय अध्यक्ष उदय सामंत यांनी आज केले. म्हाडा कर्मचारी सहकारी पतपेढीतर्फे मुलींच्या स्वागत करणाऱ्या सुकन्या स्वागत योजना व सुकन्या समाधान योजना उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी सामंत बोलत होते. मुलींचा कमी होत जाणारा जन्मदर ही समस्या आज देखशाला भेडसावत आहे. त्यादृष्टीने विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. याच मोहिमेत म्हाडा पतपेढीचा हा उपक्रम म्हणजे खारीचा वाट ठरणार आहे.मुलीचा जन्म आनंदाने साजरा करणे, तिचे स्वागत करणे व तिला शिक्षण देऊन सक्षम करणे ही एक सामाजिक गरज आहे असे मतही सामंत यांनी व्यक्त केले. शासनातर्फे अशा प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. मुलींचा जन्म म्हणजे उपेक्षित बाब नसून स्वागतार्ह घटना आहे. याची शासनाने नक्कीच नोंद घेतली पाहिजे. म्हणूनच या योजनेबाबत प्रधानमंत्र्यांना अवगत करण्याचा मानस देखील त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला. मुलींचा कमी होत जाणारा जन्मदर ही समस्या आज देशाला भेडसावत आहे. त्यादृष्टीने विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. याच मोहिमेत म्हाडा पतपेढीचा हा उपक्रम म्हणजे खारीचा वाट ठरणार आहे. मुलीचा जन्म आंनदाने साजरा करणे, तिचे स्वागत करणे व तिला शिक्षण देऊन सक्षम करणे ही एक सामाजिक गरज आहे असे मतही  सामंत यांनी व्यक्त केले. यावेळी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी देखील या दोन्ही योजनांचे कौतुक केले व इतिहासकालीन महिलांचे समाजातील अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले. महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सक्षमतेने जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीचा सन्मान नक्कीच जोपासला जात आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, मोहन कोळी, सूर्यकांत तेली आदी उपस्थित होते.समाजातील घटत चाललेला मुलीचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीने संस्थेच्या सभासदांकरिता प्रोत्साहनपर सुरु करण्यात आलेल्या सुकन्या स्वागत योजनेमध्ये ज्या सभासदास १५ ऑगस्ट २०१७ रोजी किंवा त्यानंतर मुलगी जन्माला आल्यास त्या सभासदास मुलीच्या स्वागतासाठी रु. १५०० देण्यात यावे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १८ सभासदांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सुकन्या समाधान योजनेअंतर्गत फक्त एक किंवा दोन मुली अपत्यांवर समाधानी झालेल्या सभासदास रु. १५०० देऊन सत्कार करण्यात आला. या योजनेंतर्गत ९८ सभासदांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. संस्थेच्या सभासद कल्याणकारी योजनेअंतर्गत सभासदांच्या मुलींच्या स्वागतासाठी या दोन्ही योजनांचे लाभ देताना जर सभासदाने मुलगी अपत्य दत्तक घेतलेल्या योजनेचे उर्वरित निकष पूर्ण करणाऱ्या ५ सभासदांस रु. ३००० इतकी रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.