सुमित मल्लिक होणार मुख्य माहिती आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:51 AM2018-01-02T04:51:49+5:302018-01-02T04:52:40+5:30

राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांची राज्याच्या नवे मुख्य माहिती आयुक्तपदी लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता असून त्यांच्या जागी मुख्य सचिवपदासाठी तीन नावे चर्चेत असली तरी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांचे नाव आघाडीवर आहे.

 Sumit Mallik will be the chief information commissioner | सुमित मल्लिक होणार मुख्य माहिती आयुक्त

सुमित मल्लिक होणार मुख्य माहिती आयुक्त

googlenewsNext

- विशेष प्रतिनिधी 
मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांची राज्याच्या नवे मुख्य माहिती आयुक्तपदी लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता असून त्यांच्या जागी मुख्य सचिवपदासाठी तीन नावे चर्चेत असली तरी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांचे नाव आघाडीवर आहे.
मल्लिक येत्या एप्रिलमध्ये मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त होणार होते. तथापि, ते त्याआधीच स्वेच्छानिवृत्ती घेऊन माहिती आयोगात जातील, असे मानले जात आहे. सूत्रांनी सांगितले की लवकरच त्यांची नव्या पदी नियुक्ती होईल. मुख्य माहिती आयुक्तपद सात महिन्यांपासून रिक्त आहे. रत्नाकर गायकवाड निवृत्त झाल्यानंतर या पदावर नियुक्ती न झाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आयोगाच्या कामकाजावर होत आहे.
राज्य शासनाने १५ जानेवारीपर्यंत मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिले आहेत. या आधी न्यायालयाने १२ डिसेंबरची डेडलाइन दिलेली होती पण राज्य शासनाने ती मुदत वाढवून घेतली होती.
मल्लिक यांच्या जागी नवे मुख्य सचिव पदासाठी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी.के.जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांची नावे चर्चेत आहेत. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पसंती ही डी.के.जैन असेल असे म्हटले जाते.

 

Web Title:  Sumit Mallik will be the chief information commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.