Join us

उन्हाळ्याचा कडाका, सणासुदीला गॉगलची स्टाईल, बॅ्रण्डेड गॉगल्सची किंमत १ हजारापासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 4:17 AM

आॅक्टोबर हीटचा तडाखा मुंबईकर सहन करत आहेत. त्यामुळे डोळ््यांचे आजार वाढले आहेत. वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी मुंबईकर हटके आणि स्टायलिश गॉगल्सना पसंती देत आहेत

सागर नेवरेकरमुंबई : आॅक्टोबर हीटचा तडाखा मुंबईकर सहन करत आहेत. त्यामुळे डोळ््यांचे आजार वाढले आहेत. वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी मुंबईकर हटके आणि स्टायलिश गॉगल्सना पसंती देत आहेत. देश -विदेशातील ब्रँड्सच्या गॉगल्सची बाजारपेठ त्यामुळे वाढली असल्याचे दिसून आले आहे. शिवाय, आॅनलाइन संकेतस्थळांवर घसघशीत सवलत मिळाल्याने गॉगल्सच्या खरेदीसाठी मुंबईकर ई-कॉमर्सचा मार्गही पत्करत आहेत.युएसए, फ्रान्स, जर्मनी, तैवान, चीन, जपान, सिंगापूरइत्यादी देशातून भारतात विविध बॅ्रण्डच्या गॉगल्सला मागणी आहे. व्होग, आयडी, रे-बेन, लॅक्सेस, फास्टटॅÑक इत्यादी गॉगलचे बॅ्रण्ड हे देशात मोठ्या प्रमाणात विकले जातात. बॅ्रण्डेड गॉगल्सची किंमत १ हजारापासून बाजारात सुरु होते. इंडियन ब्रॅण्डमध्ये लॅक्सेस आणि लाईफ स्टाईल यांची विशेष मागणी ग्राहकांकडून असते. उन्हासाठी युव्ही कॉन्टॅक्ट ग्लासच्या गॉगलची बाजारात मोठी मागणी आहे. तसेच मोबाईल आणि कॉम्प्युटरपासून डोळ््याच्या संरक्षणासाठी देखील वैशिष्ट्यपूर्ण गॉगल्स तयार केले जातात. गॉगल्समध्ये नंबरचे आणि गडद रंगाचा गॉगल वापरण्याची के्रझ वाढलेली आहे. चांगल्या बॅ्रण्डेड गॉगल दोन वर्षांपर्यंत वापरावे. प्रत्येकाच्या चेहºयाला सूट होणारे गॉगल बाजारात उपलब्ध आहेत, अशी माहिती आर. एन. शिंदे अ‍ॅण्ड सन्सच्या नीता शिंदे यांनी दिली.फास्टट्रॅक आणि पोलारॉईडच्या ब्रॅण्डला सध्या चांगली मागणी आहे. रे-बेन्सचे गॉगल तरुणाईची जास्त पसंती आहे. गॉगल ट्रेंडनुसार वापरण्याचा सध्याचा कल असून चित्रपटसृष्टीतील कलाकार जसे गॉगल वापरता त्याप्रमामे अनुकरण करण्याचा फॅशन ट्रेंड बाजारात असल्याचे देसाई आॅप्टिशियन्सचे श्याम देसाई यांनी सांगितले.गॉगल का वापरावागॉगलचा खरा वापर डोळ््यांच्या संरक्षणासाठी करावा. डोळ््याच्या बाजूला कोमल त्वचेचे संरक्षण झाले पाहिजे, त्यासाठी गॉगलचा वापर करणे गरजेचे आहे. बाजारात युव्ही ४१०० गॉगल हा अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून संरक्षण करतो. पोलारॉईड लेन्सेस उच्च प्रतिचा गॉगल असून युव्ही ब्लॉकिक आणि रिफलॅक्शनपासून बचाव करतो. कोणतेही सन ग्लासेस् घेताना डोळ््याला इजा होऊन नये यासाठी युव्ही ४१०० आणि पोलारॉईड लेन्सेसचा वापर करावा.गॉगल योग्य पद्धतीने हाताळावा, म्हणजे गॉगलला स्क्रच पडता कामा नये. नाहीतर डोळ््यांना इजा होण्याची शक्यता असते. बाजारात अनबॅ्रण्डेड गॉगल उपलब्ध असतात. गॉगल घेताना युव्ही ४१०० किंवा पोलारॉईड असल्याची खात्री करुन खरेदी करावे.गॉगल किंमतफास्टस्ट्रक्ट ८०० रु. पासूनआयडी १८०० रु. पासूनव्हॅलोसिटी १५०० रु. पासूनव्होग ५००० रु. पासूनजो अर्मानी ५००० रु. पासूनरिबॉक ५००० रु. पासूनलोकास्ट ७००० रु. पासूनपोलारॉईड ७००० रु. पासूनरे-बेन ८००० रु. पासून