आला उन्हाळा... आरोग्य सांभाळा

By admin | Published: March 6, 2016 01:37 AM2016-03-06T01:37:36+5:302016-03-06T01:37:36+5:30

उन्हांची झळ... घामाच्या धारा... यामुळे येणारे असा आजारपण असा अनुभव देणारा मार्च-एप्रिल आणि मे महिना नकोनकोसा वाटतो. उन्हामुळे उष्माघाताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते़

Summer got ... health care | आला उन्हाळा... आरोग्य सांभाळा

आला उन्हाळा... आरोग्य सांभाळा

Next

तलवाडा : उन्हांची झळ... घामाच्या धारा... यामुळे येणारे असा आजारपण असा अनुभव देणारा मार्च-एप्रिल आणि मे महिना नकोनकोसा वाटतो. उन्हामुळे उष्माघाताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते़ त्यामुळे मृत्यूही होणे संभवनीय असते़ मात्र उष्माघाताचा प्रादूर्भाव होण्याआधी प्रतिबंधात्मक उपाय केल्यास तो टळू शकतो़, असे विक्रमगड ग्रामीण रुग्णालयातील डॉ़ सुनिल भंडागे, व डॉ़ मिलिंद खांडवी यांनी लोकमतशी बोलता सांगीतले
उन्हामुळे अंगाची लाही-लाही होते त्यापासून बचाव करण्यासाठी कोणी छत्रीचा तर कोणी गॉगल, टोपीचा वापर करतात. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही. उष्णतेशी संबंध आल्यास उष्माघात होतो़ थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेनी व अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी लक्षणे दिसतात अशी माहती डॉ़ अरुण मनोरे यांनी दिली़ उन्हाळयात शेतात अथवा कुठेही शारीरिक कष्टाची कामे फारवेळ केल्यास तसेच कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम केल्यास उष्माघात होउ शकतो. जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम केल्यास आणि घटट कपडे वापरल्यासही उष्माघात होउ शकतो़ उष्माघात झालेल्या रुग्णाला हवेशीर अथवा वातानुकूलित खोलीमध्ये ठेवावे़ हवेशीर खोलीत पंखे अथवा कुलर ठेवावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रुग्णाला बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पटटया ठेवाव्यात तसेच आईसपॅड लावावेत सलाईन लावावे अशा प्रकारचे उपचार करावेत असेही डॉक्टंराकडून सांगण्यात आले़
उष्माघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वाढत्या तापमानात फार वेळ कष्टांची कामे करणे टाळावे़ कष्टांची कामे करणे भागच असेल तर ती सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमान असतांना करावीत़ उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे कपडे) वापरु नयेत़ सैल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, अधूनमधून उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी, वरील लक्षणे दिसतात. तााबडतोब उन्हांंत काम थांबवावे व उपचार सुरु करावा़ उन्हात बाहेर जांताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपकरणे यांचा वापर करावा असे केल्यास उष्माघात टळू शकतो.

Web Title: Summer got ... health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.