उन्हाळा सुरू, तब्येत सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 02:13 PM2024-03-08T14:13:46+5:302024-03-08T14:14:47+5:30

गेल्या महिन्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसासह गारपिटीने थैमान घातले होते. तर आता वैशाख वणव्याप्रमाणे कमाल तापमान वाढू लागले आहे. मुंबईत तर दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी असे दुहेरी वातावरण होते. आता यातही बदल होतील, अशी शक्यता आहे.

Summer is on, take care of your health | उन्हाळा सुरू, तब्येत सांभाळा

उन्हाळा सुरू, तब्येत सांभाळा

मुंबई : मुंबईसह राज्याला उन्हाळ्याची चाहूल लागली असून, गुरुवारी राज्यभरातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ३५ अंशावर नोंदविण्यात आले आहे. मालेगाव, परभणी आणि सोलापूरच्या कमाल तापमानाने तर ३७ अंशाचा आकडा गाठला आहे. पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमान याच पद्धतीने उसळी घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
 
गेल्या महिन्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसासह गारपिटीने थैमान घातले होते. तर आता वैशाख वणव्याप्रमाणे कमाल तापमान वाढू लागले आहे. मुंबईत तर दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी असे दुहेरी वातावरण होते. आता यातही बदल होतील, अशी शक्यता आहे.

मुंबईत नोंदविण्यात येणारे ३३ अंश हे कमाल तापमान सर्वसाधारण आहे. उन्हाळ्याची आता चाहूल लागत आहे. पुढील ३ ते ४ दिवस ३३ ते ३४ अंश कमाल तापमान नोंदविले जाईल. किमान तापमान २० ते २१ अंश राहील. चार ते पाच दिवसांनी हवामानात पुन्हा बदल होतील.
    - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग  

Web Title: Summer is on, take care of your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.