उन्हाळा तापदायक; किमान तापमानाचा पाराही वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:06 AM2021-03-10T04:06:40+5:302021-03-10T04:06:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील शहरांचे कमाल तापमान वाढत असतानाच आता किमान ...

Summer scorching; The minimum temperature mercury will also increase | उन्हाळा तापदायक; किमान तापमानाचा पाराही वाढणार

उन्हाळा तापदायक; किमान तापमानाचा पाराही वाढणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील शहरांचे कमाल तापमान वाढत असतानाच आता किमान तापमानाचा पाराही वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्र विभागाने दिली. त्यामुळे यंदाचा उन्हाळा जास्तच तापदायक ठरेल.

भारतीय हवामानशास्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी झालेल्या नाेंदीनुसार ठाणे, मुंबई, नांदेड, परभणी, महाबळेश्वर, सातारा, सांगली, रत्नागिरी, पुणे, जळगाव, जालना, नाशिक, औरंगाबाद, डहाणू, बारामती, मालेगाव, माथेरान आणि सोलापूर या शहरांचे किमान तापमान २० ते २२ अंशांच्या आसपास नोंदविण्यात आले. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातील शहरांच्या कमाल तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ नोंदविण्यात येत असून, ते ३६ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे यंदा उन्हाळा घाम फोडणारा ठरेल. विशेषतः विदर्भाच्या कमाल तापमानात मोठी वाढ होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, नागरिकांनी घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.

...

Web Title: Summer scorching; The minimum temperature mercury will also increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.