मुंबई : तलावांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अडीच लाख दशलक्ष लीटर कमी जलसाठा आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून मुंबईत १० टक्के पाणीकपाती लागू करण्यात आली आहे. पाण्याची गळती, चोरी आणि बाष्पीभवनमुळे तलावांमध्ये ३१ जानेवारीपर्यंत सात लाख १४ हजार दशलक्ष लीटर जलसाठा शिल्लक राहिला़ त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे तलावांमध्ये १५ टक्के जलसाठा कमी जमा झाला. पालिकेने १५ नोव्हेंबर रोजी तलावांमधील जलसाठ्याचा आढावा घेऊन सरसकट १० टक्के पाणीकपात लागू केली. या पाणीकपातीची झळ अनेक विभागांना बसली. याचे तीव्र पडसाद स्थायी समिती, महापालिकेची महासभा, प्रभाग समित्यांच्या बैठकीत उमटले. विभागात पाणी मिळत नसल्याने रस्त्यावरून चालणे मुश्कील झाल्याची तक्रार सर्वपक्षीय नगरसेवक करीत आहेत, परंतु हिवाळ्यात पाण्याचा वापर कमी होत असल्याने त्याचा दिलासा मुंबईकरांना मिळेल, अशी आशा व्यक्त होत होती.मात्र, ३१ जानेवारी रोजी घेतलेल्या आढाव्यात प्रमुख तलावांमध्ये सात लाख १४ हजार दशलक्ष लीटर जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच तारखेला नऊ लाख दशलक्ष लीटर जलसाठा उपलब्ध होता. या वर्षी अडीच लाख दशलक्ष लीटर जलसाठ्याची तफावत आढळून आली आहे. एप्रिल, मे महिन्यात याची झळ मुंबईकरांना बसणार असल्याने, पाण्याच्या नियोजनासाठी पाणीकपातीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पाणी कपात झाल्यास मुंबईकरांचे उन्हाळ्यात होणार हे जवळपास निश्चित झाले आहे़4200 दशलक्ष लीटर पाण्याची मुंबईला गरज3800 दशलक्ष लीटर सध्याचा मुंबईचा पाणीपुरवठा800-900 दशलक्ष लीटर दररोजची पाणीचोरी व गळती1447000 दशलक्ष लीटर १ ऑक्टोबर २०१८ रोजी तलावांमध्ये अपेक्षित जलसाठा15% कमी जलसाठा900000 दशलक्ष लीटर ३१ जानेवारी २०१८ रोजी तलावांमधील जलसाठा 714000 दशलक्ष लीटर ३१ जानेवारी २०१९ रोजी तलावांमधील जलसाठा
ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी; मुंबईकरांचे टेन्शन वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 12:59 AM