उन्हाळा घाम फाेडणार; विजेची मागणीही वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 02:56 AM2021-03-13T02:56:40+5:302021-03-13T02:57:01+5:30

महावितरणचे नियाेजन; २ कोटी ८० लाख ग्राहकांना अखंडित पुरवठा

Summer will break a sweat; Demand for electricity will also increase! MSEDCL management; Uninterrupted supply to 28 million customers | उन्हाळा घाम फाेडणार; विजेची मागणीही वाढणार!

उन्हाळा घाम फाेडणार; विजेची मागणीही वाढणार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उन्हाळ्यामुळे येत्या एप्रिल व मे महिन्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ होणार असल्याने सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून तयारी सुरू झाली आहे. नुकेतच मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात व महावितरणच्या कार्यक्षेत्रात २२ हजार ३३९ मेगावॉट विजेची आजवरची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. या मागणीप्रमाणे नियोजनातून वीजपुरवठा करून महावितरणने उच्चांकी वीजपुरवठ्याचा विक्रमी टप्पा गाठला.

उन्हाच्या झळा वाढत आहेत. परिणामी गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत वाढ हाेत आहे. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून सुमारे २ कोटी ८० लाख ग्राहकांना उच्चांकी २२ हजार ३३९ मेगावॉट विजेचा अखंडित पुरवठा करण्यात आला. कुठेही विजेचे भारनियमन करण्यात आले नाही. दरम्यान, १९ फेब्रुवारी २०२० रोजी उच्चांकी मागणीप्रमाणे आतापर्यंत २१ हजार ५७० मेगावॉट विजेचा विक्रमी पुरवठा केला होता. मात्र मंगळवारी हा विक्रमही मोडीत निघाला.

दीर्घकालीन करारानुसार मिळणारी वीज
महानिर्मितीकडून ७७६१ मेगावॉट, एनटीपीसी व एनपीसीआयएल ४२१६ मेगावॉट, अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्को आदींकडून ४२०२ मेगावॉट, सौर ऊर्जेद्वारे १९७४, नवीन व नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांतून ३१६२, कोयना, घाटघर व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १७४०, पॉवर एक्सचेंजमधील खरेदीसह मुक्त ग्राहक वीजनिर्मिती स्त्रोताद्वारे १२५८ मेगावॉट.

Web Title: Summer will break a sweat; Demand for electricity will also increase! MSEDCL management; Uninterrupted supply to 28 million customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.