सोशल साइट्सवर ‘सूर्यदेवता’ हिट

By Admin | Published: May 21, 2015 01:18 AM2015-05-21T01:18:25+5:302015-05-21T01:18:25+5:30

सकाळीच कामानिमित्त घराबाहेर पडणारा नोकरदार वर्ग असो किंवा घरातील दैनंदिन कामे आटोपणारा महिलावर्ग असो, सर्वांच्याच तोंडी ‘वाढता उन्हाळा’ हाच विषय आहे.

'Sun god' hits on social sites | सोशल साइट्सवर ‘सूर्यदेवता’ हिट

सोशल साइट्सवर ‘सूर्यदेवता’ हिट

googlenewsNext

मुंबई : वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या जिवाची काहिली होत आहे. सकाळीच कामानिमित्त घराबाहेर पडणारा नोकरदार वर्ग असो किंवा घरातील दैनंदिन कामे आटोपणारा महिलावर्ग असो, सर्वांच्याच तोंडी ‘वाढता उन्हाळा’ हाच विषय आहे. इतकेच काय प्राणी, पक्षीही उन्हाने हैराण असल्याची व्यंगचित्रे सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर होत आहेत.
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टिष्ट्वटरवरही सूर्यनारायणाच्या अवकृपेमुळे सर्वांचा घामटा निघाला आहे. ‘सूर्याला तुझे टेम्परेचर कमी कर’ म्हणून विनवण्या करणारे मेसेजेस फिरत आहेत. तर कधी सूर्यदेवताच ‘बहनजी! आप पापड अन्दरही सुखा लो!! फिर मत कहना मैंने भून डाले!!!,’ असा सल्ला
देतानाचे व्यंगचित्र असणारी पोस्ट अनेकांच्या मोबाइलमध्ये डोकावली असेल.
गेल्या काही दिवसांत विदर्भातील तापमान ४६, ४७ ते अगदी ४८ अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यातच आयपीलचा फीवरही असल्याने एक विदर्भकर या नारायणासमोर हात जोडून विनंती करतोय की, अरे देवा, बस झालं ना! आता काय हाफ सेंच्युरी मारता काय?’ यात सूर्यदेवता कुत्सिततेने हसत आहे.
या कडक उन्हामुळे अगदी प्राणी, पक्ष्यांचेही हाल झाले आहेत. पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवण्याचे आवाहनही या सोशल साइट्सवर होत आहे.
एका पोस्टमध्ये पक्ष्यासाठी ठेवलेले पाणीही गरम झाल्याने हा पक्षी ‘बहनजी, इसमें थोडा बर्फ भी डाल दो ना’ अशी विनंती या महिलेस करीत आहे. त्यामुळे सूर्य कोपला असल्याची चर्चा सर्वत्र होत असून, आता वरुणराजाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे; जेणेकरून वातावरण थंड होऊन पृथ्वी शांत होईल. (प्रतिनिधी)

च्सुट्यांचा मोसम असल्याने फिरायला गेलेले नेटीझन्स फेसबुक वॉलवर विविध ठिकाणचे चेकइन्स करत आहेत. याबरोबरच हॉट क्लायमेट, फिलिंग सुपरहॉट अशा कमेंट्स पोस्ट करत आहेत. तसेच क्लायमेट इज गिविंग टफ कॉम्पिटिशन टू हॉट गर्ल्स, अशा जोक्सचेही शेअरिंग जोरदार आहे.

च्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नेटीझन्सनी आता तरी धडा घ्यावा, याबाबतची एक पोस्ट सोशल साइट्सवर पसंती मिळवत आहे. ‘उन्हाळ्यात गाडी लावायला झाडं शोधता ना? मग आता पावसाळ्यात झाड लावायला जागा शोधा!!!’ असा उपदेश यात दिला आहे.

Web Title: 'Sun god' hits on social sites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.