रेसकोर्सवरील ‘सनबर्न’ बेकायदा

By admin | Published: January 13, 2017 07:12 AM2017-01-13T07:12:06+5:302017-01-13T07:12:06+5:30

गोव्यापाठोपाठ पुण्यातही वादग्रस्त ठरलेला ‘सनबर्न उत्सव’ शुक्रवारी मुंबईत महालक्ष्मी

'Sunburn' bikaida on racecourse | रेसकोर्सवरील ‘सनबर्न’ बेकायदा

रेसकोर्सवरील ‘सनबर्न’ बेकायदा

Next

मुंबई : गोव्यापाठोपाठ पुण्यातही वादग्रस्त ठरलेला ‘सनबर्न उत्सव’ शुक्रवारी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर आयोजित करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमाला महापालिकेची परवानगी नसल्याने हा कार्यक्रम बेकायदेशीर असल्याचे प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी घाईघाईने जाहीर केले. ही जागा राज्य सरकार आणि महापालिकेच्या मालकीची असताना पालिकेच्या नाकाखाली हा बेकायदा कार्यक्रम होत आहे. परंतु हा कार्यक्रम रोखण्याऐवजी त्यामध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन करून महापालिकेने हात झटकले आहेत.
महालक्ष्मी रेसकोर्सची देखभाल व घोड्यांची शर्यत आयोजित करणाऱ्या मेसर्स रॉयल टर्फ क्लब या संस्थेचा महापालिकेशी असलेला करार २०१३मध्ये संपुष्टात आला. या संस्थेने पोटभाडेकरू ठेवून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने या कराराचे नूतनीकरण करण्यास शिवसेनेचा विरोध आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बांधण्याचा प्रस्ताव शिवसेनेने राज्य सरकारकडे पाठवला आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, या ठिकाणी शुक्रवारी दुपारी ४ वाजता सनबर्न हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आशियातील सर्वांत मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक महोत्सव म्हणजेच सनबर्न उत्सव हा यापूर्वी गोव्यामध्ये होत होता. गेली नऊ वर्षे हा कार्यक्रम होत आहे. मात्र हा कार्यक्रम अमलीपदार्थांच्या सेवनास प्रोत्साहन देत असल्याचा आरोप होऊ लागला. त्यानुसार गोवा राज्य सरकारने या कार्यक्रमावर बंदी घातली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये हा कार्यक्रम हलवण्यात आला होता. परंतु तेथेही विरोध झाला. आता हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यास महापालिकेची परवानगी नाही. मात्र संबंधितांवर कारवाईऐवजी कार्यक्रमाला जाऊ नका, असे अजब आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)

तिकीट घेऊ नका
या कार्यक्रमाचे तिकीट २ हजार ३०० रुपयांना उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ही जागा महापालिका आणि राज्य सरकारची आहे. तरीही हा बेकायदा कार्यक्रम रोखण्याऐवजी तिकीट खरेदी करू नका, असे अजब आवाहन करीत प्रशासनाने हात वर केले आहेत.

महालक्ष्मी रेसकोर्सचा ५ लाख ९६ हजार ९५३ चौरस मीटरचा भूखंड राज्य सरकारच्या मालकीचा असून, २ लाख ५८ हजार २४५ जागेवर पालिकेचा हक्क आहे़

१८८३मध्ये कुश्रो एन वाडिया यांनी ही २२५ एकर जागा पालिकेला दान केली़. मेलबोर्नमधील कोलफिल्ड रेसकोर्सच्या धर्तीवर ‘महालक्ष्मी रेसकोर्स’ तयार झाले़

१९१४मध्ये पालिकेने ही जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला ९९ वर्षांच्या भाडेकरारावर दिली़ हा करार ३१ मे २०१३ रोजी संपुष्टात आल्यानंतर ३० वर्षांची मुदतवाढ मिळण्याची विनंती क्लबचे अध्यक्ष कुश्रो धुनजीभॉय यांनी केली आहे़

Web Title: 'Sunburn' bikaida on racecourse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.