रविवार मिळाला छुप्या प्रचारासाठी, सुट्टीच्या दिवशी सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 02:29 AM2019-04-28T02:29:26+5:302019-04-28T02:29:44+5:30

चौथ्या टप्प्याच्या मतदानाची आचारसंहिता शनिवारी संपली़ त्प्रचारसभा, बाईक रॅली, पथनाट्ये या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढण्यात आला़ मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने गृहनिर्माण सोसायट्यांना भेटी देणे, मंडळांशी चर्चा करणे, या सर्वाचे नियोजनही शनिवारी करण्यात आले़

Sunday has been possible to reach all voters on holiday, for the hidden campaign | रविवार मिळाला छुप्या प्रचारासाठी, सुट्टीच्या दिवशी सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य

रविवार मिळाला छुप्या प्रचारासाठी, सुट्टीच्या दिवशी सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य

Next

पूनम महाजनसाठी मुख्यमंत्री प्रचारात; अपक्षांच्या प्रचारफेऱ्या
प्रचाराचा शेवटचा दिवस प्रचारफेºया, चौकसभा, कार्यकर्त्यांशी संवाद अशा विविध प्रकारे उमेदवारांनी वापरुन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. उत्तर मध्य मतदारसंघातील कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कुर्ला पश्चिम भागात प्रचार फेरी काढली. तर, भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्यासाठी मुख्यमंत्री रोड शो च्या माध्यमातून मैदानात उतरल्याचे चित्र होते. वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवारांनी प्रचारफेऱ्यांसहित मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला.

कुर्ला पश्चिम येथील कॉंग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी व अर्शद आझमी यांनी कुर्ला पश्चिम येथील बस स्थानकाजवळून पाईप रोड, एमआयजी कॉलनी मार्गे शिवाजी चौक, भारत सिनेमा पर्यंत प्रचारफेरी काढली. यामध्ये प्रिया दत्त यांच्यासहित कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. दत्त यांनी सहार रोड येथे देखील रोड शो केला.
महाजन यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रोड शो केल्याने त्याचा लाभ महाजन यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या रोड शो साठी संरक्षण-सुरक्षा विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे व मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू स्वत: रस्त्यावर उतरुन बंदोबस्ताचा आढावा घेत होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ए.आर.अंजारीया यांनी कुर्ला भागात मतदारांशी संपर्क साधला. तर, अपक्ष उमेदवार सुंदर पाडमुख यांनी विलेपार्ले, जरीमरी, बेहरामनगर,सहारगाव वांद्रे पूर्व भागात प्रचार फेरी काढली. प्रकल्पबाधित होणाºया नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा दावा केलेल्या पाडमुख यांना प्रचारफेरीमध्ये प्रतिसाद मिळाला़

हायटेक व डिजीटल प्रचाराची सांगता
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात विद्यमान महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यात चुरशीची लढत आहे. गेली १९ दिवस सुरू असलेल्या या दोघा दिग्गज उमेदवारांच्या हायटेक व डिजिटल प्रचाराची शनिवारी सायंकाळी ५ वाजता सांगता झाली.

कीर्तिकर यांनी आज प्रचाराचा शेवटचा दिवस अतिशय व्यस्त होता. सकाळी ९ ते १०.३० पर्यंत जोगेश्वरी विधानसभेतील वनराई व बिंबिसार नगर येथे त्यांच्या प्रचारफेरी काढली. नंतर जोगेश्वरी विधानसभा कार्यालयात त्यांनी अल्पसंख्यांक बांधवांची भेट घेतली. सकाळी ११ ते १२.३० पर्यत त्यांनी गोरेगाव विधानसभा मतदार संघातील ओशिवारा नाला, लिंक रोड, भगतसिंग नगर १, २, ३ वसंत गँलेक्सी, बांगूर नगर परिसर येथे प्रचार फेरी काढली. या दोन्ही प्रचार फेरीत महायुतीचे कायकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तिकर यांनी दुपारी ४ ते ५ या वेळेत गोरेगाव पश्चिम, जवाहर नगर येथे पटेल समाजाबरोबर बैठक घेतली. संजय निरुपम यांनी प्रचाराचा पूर्ण दिवस सार्थकी लावला. सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रचारफेरीला गोरेगाव पूर्व ओबेरॉय मॉल पासून सुरुवात झाली. गोरेगाव सावरकर उड्डाणपूल मार्गे गोरेगाव पश्चिम येथील एमटीएनएल जंक्शन मार्गे एस.व्ही.रोड, राम मंदिर रोड, ओशिवरा, बेहराम बाग नाका, आंबोली नाका, अंधेरी मार्केट, जे.पी.रोड, चार बंगला, मॉडेल टाऊन, शास्त्री नगर, लोखंडवाला, ओशिवरा, आदर्श नगर जंक्शन, डी. एन.नगर, जुहू सर्कल मार्गे अंधेरी पश्चिम काँग्रेस विधानसभा कार्यालय येथे रॅलीची समाप्ती झाली. त्यांनतर जुहू गल्ली येथे ४ ते ५ या वेळेत त्यांनी सभा घेऊन मार्गदर्शन केले.

चौकसभा, बाईक रॅली
महिनाभर सुरु असलेल्या प्रभात फेºया, चौक सभा, भेटीगाठी दक्षिण मुंबईत शेवटच्या काही तासांपर्यंत रंगत होत्या. शेवटच्या टप्प्यात काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी सकाळच्या सत्रात वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांची भेट घेतली. तर मदनपुरात रॅली आणि क्रॉर्फ्ड मार्केट परिसरा बाईक रॅली काढण्यात आली. त्याचवेळी शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी मलबार हिल येथील जैन देरासराला भेट दिली. शिवडी, दारुखाना येथील रॅलीत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा सहभाग होता. कमी मतं मिळण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघावर म्हणजे काँग्रेसने वरळी बीडीडी चाळ आणि शिवसेनेने मलबार हिल येथे आज दिवसभर प्रचार सुरु ठेवला. तर संध्याकाळी प्रचाराची वेळ संपण्यापूर्वी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत सांगता केली.

Web Title: Sunday has been possible to reach all voters on holiday, for the hidden campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.