Join us

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध देखभाल दुरुस्ती कामांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विविध देखभाल दुरुस्ती कामांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.तर रविवारी दिवसकालीन पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेमार्गावर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. मुलुंडहून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

कल्याणहून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या / अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान सुटणाऱ्या / येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या सेवा नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ (बेलापूर-खारकोपर बीएसयू लाइन वगळता) दरम्यान मेगाब्लॉक असेल. पनवेलहून सकाळी १०.४९ ते दुपारी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ पर्यंत पनवेल/ बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेलहून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाण्याहून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

नेरुळहून सकाळी १०.१५ ते दुपारी २.४५ या वेळेत खारकोपरसाठी सुटणाऱ्या डाऊन बीएसयू रेल्वे मार्गावरील सेवा आणि खारकोपरहून सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत नेरुळसाठी सुटणाऱ्या अप बीएसयू मार्गावरील सेवा रद्द राहतील.