मुंबई : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व विद्याविहार दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या धिम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील तसेच या सेवा मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत व त्यानंतर नियोजित मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप- धिम्या मार्गावरील रेल्वे सेवा विद्याविहार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत तसेच या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशीद या स्थानकांवर थांबणार नाहीत. ब्लॉककाळात रेल्वे सेवा मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार या स्थानकांवर उपलब्ध होणार नाहीत. हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा व पनवेल/ बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 1:44 AM