Join us

सुनील मानेची रवानगी न्यायालयीन कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:06 AM

जाधव, शेलारच्या कोठडीत वाढ; अँटिलिया स्फोटक कार, मनसुख हिरेन हत्या प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अँटिलिया स्फोटक कार ...

जाधव, शेलारच्या कोठडीत वाढ; अँटिलिया स्फोटक कार, मनसुख हिरेन हत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अँटिलिया स्फोटक कार प्रकरण आणि ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या चकमक फेम प्रदीप शर्मा याचा निकटवर्तीय समजला जाणारा बिल्डर संतोष शेलार याच्यासह आनंद जाधव याच्या कोठडीत १ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे, तर बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील मानेला २ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

एनआयएने शर्मा यांना लोणावळा येथून ताब्यात घेत १७ जूनला अटक केली. ते २८ जूनपर्यंत एनआयएच्या कोठडीत आहेत. दरम्यान, एनआयएने याच प्रकरणात अटक केलेल्या सुनील माने आणि शर्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी एनआयएने माने यांची २५ जूनपर्यंत कोठडी मिळवली होती. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष एनआयए न्यायालयाने त्यांना २ जुुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

दुसरीकडे शेलार याच्यासह जाधव याच्या कोठडीत १ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली. मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहत असलेल्या या दोघांना एनआयएने ११ जून रोजी लातूरमधून ताब्यात घेत अटक केली होती. त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती एनआयएच्या हाती लागली असून, त्याच्या अधिक तपासासाठी त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी करण्यात आली होती.

....................................................