Join us

सुनील मानेचीही पोलीस दलातून हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने यालाही सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून ही कारवाई केली.

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करणे आणि मनसुख हिरेन यांची हत्या घडवून आणल्याप्रकरणी सचिन वाझेला अटक होताच मुंबई पोलीस दलावर टीकेची झोड उठली. या प्रकरणी एनआयएने वाझेसह पोलीस रियाझुद्दीन काझी आणि सुनील माने या अधिकाऱ्यांसह अंमलदार विनायक शिंदे याला अटक केली.

अटक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. वाझे आणि काझी या दोघांनाही सेवेतून बडतर्फ करण्यात आले. पुढे शिंदेलाही पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यापाठोपाठ पोलीस निरीक्षक सुनील माने यालाही बडतर्फ करण्यात आले आहे.

.....................................