सुनिल पाटीलने 'या' दोन भाजप नेत्यांचं नाव घेतलं, ड्रग्जप्रकरणी आणखी मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 06:57 PM2021-11-07T18:57:23+5:302021-11-07T18:58:06+5:30
सुनील पाटील घराला टाळं लावून पळण्याची गरज काय होती? सुनील पाटील आणि नवाब मलिक यांचे २० वर्षापासून संबंध आहेत.
मुंबई - राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) आणि भाजपाचे मोहित भारतीय यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आर्यन खानचं अपहरण करुन वसुली करण्यामागे मास्टर माईंड मोहित भारतीय असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. त्यानंतर, आता मोहित भारतीय यांनी मलिकांच्या आरोपावर उत्तर देत नवाब मलिक वैफल्यग्रस्त झालेत. त्यामुळे खोटे आरोप करत असल्याचा पलटवार केला. तत्पूर्वी मोहित भारतीय यांनी ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील यांचं नाव घेतलं होता. आता, सुनिल पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली आहे.
सुनील पाटील घराला टाळं लावून पळण्याची गरज काय होती? सुनील पाटील आणि नवाब मलिक यांचे २० वर्षापासून संबंध आहेत. अनिल देशमुख आणि चिंकू पठाण यांची बैठक कशासाठी झाली? चिंकू पठाणला हत्यार आणि कॅशसोबत अटक केली. चिंकू पठाण अटकेनंतर २० जणांना अटक केली गेली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस गप्प का? असा सवाल मोहित भारतीय यांनी विचारला आहे. तसेच, सुनिल पाटील यांचं नाव घेत राष्ट्रवादीच ड्रग्जप्रकरणात मास्टरमाईंट असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता, सुनिल पाटील यांनी समोर येऊन भाजपा नेत्यांची नावे घेतली आहेत.
सुनिल पाटील यांनी माध्यमास दिलेल्या मुलाखतीत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मनिष भानुशाली आणि धवल भानुशाली यांच्याकडून माझ्या जीवाला धोका होता, त्यामुळे मी गायब होतो. मी काही दिवस गुजरातमध्ये होतो, मला दिल्लीलाही बोलाविण्यात येत होतं. किरीट सोमय्या, राम कदम या नेत्यांशी भेट घडवून तुला सेफ करू, असेही सांगण्यात येत होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील यांनी केला आहे.
माझी एकच चूक आहे, सॅम डिसुझा, किरण गोसावी आणि मनिष भानुशाली यांची ओळख करुन दिली. माझ्याकडे ड्रग्ज केसप्रकरणाची जी लिस्ट आली ती नीरज यादवकडून आली होती, नीरज यादव हे मध्य प्रदेशातील भाजप नेत्यांच्या जवळचे आहेत. माझ्या याप्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे सुनिल पाटील यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितले. तसेच, माझ्याकडे आलेल्या लिस्टमध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं, माझ्याकडे ही लिस्ट मनिष भानुशालीकडून आली होती. मी आता मुंबई पोलिसांसमोर जाणार आहे, कारण मला त्यांच्याकडून समन्स आले होते, असेही सुनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक घाबरले आहेत
ललित हॉटेलचे सीसीटीव्ही बाहेर आणावेत. या हॉटेलच्या २ किमी परिसरात मी दिसलो असेल तर माझ्यावर कारवाई करावी. परंतु सह्याद्री गेस्ट हाऊसवर दाऊदचा हस्तक काय करत होता त्यावर उत्तर द्यावं. सरकारचं भय दाखवून घाबरण्याचा प्रयत्न कराल परंतु त्याला भीक घालणार नाही. चिंकू पठाण आणि समीर खान यांचा संबंध काय? नवाब मलिकांनी नोटिशीला उत्तर का दिलं नाही? नवाब मलिक घाबरले आहेत. मलिकांचं पाप जनतेसमोर आलं आहे. ११०० कोटींचा आरोप खोटा आहे. पुरावे असतील तर सिद्ध करावं, असं आवाहन मोहित भारतीय यांनी केले आहे.